‘इंडियन एक्सप्रेस’ आपली नवीन सहा भागांची मालिका ‘एक्सप्रेसो’ आज लाँच करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात दोन स्टार कलाकार हजेरी लावणार आहे. अभिनेत्री विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्या मुलाखतीने या मालिकेची सुरुवात होणार आहे. हे दोघेही लवकरच ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

‘एक्सप्रेसो’ हा तास-दीड तासांचा लाइव्ह कार्यक्रम आहे. यात प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. हा कार्यक्रम मुंबईतील ताज लँड्स एंड इथं पार पडतोय. यात ते त्यांचे करिअर, आयुष्य, लग्न चित्रपट आणि सर्व आवडत्या गोष्टींसह अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहेत. कार्यक्रम तुम्हाला खाली दिलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल.

विद्या व प्रतिक यांचा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.