दिग्गज चित्रपट लेखक सलीम खान हे सिनेसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांनी असा निर्णय घेतला, ज्याकडे खूप लोकांनी तुच्छतेने पाहिलं. सलीम यांनी सलमा खानशी लग्न केलं होतं, त्यांना चार मुलं होती आणि ते अभिनेत्री हेलनच्या प्रेमात पडले, इतकंच नाही तर हेलनशी लग्नही केलं. सलीम खान यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींसोबतच्या नातेसंबंधांबद्दल एकदा खुलासा केला होता. सुरुवातीच्या काळात एकमेकांशी जुळवून घेणं प्रत्येकासाठी कठीण होतं, पण नंतर गोष्टी ठिक झाल्या, असं ते म्हणाले होते.

‘डीएनए’ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान सलमा आणि हेलनबद्दल बोलले होते. “मी भाग्यवान आहे की मला दोन बायका आहेत आणि त्या एकोप्याने राहतात. माझ्या दोन्ही पत्नी दिसायला सुंदर आहेत आणि आता त्या वृध्द होत आहेत.” सलीम खान यांनी त्या तेव्हा कबूल केलं होतं की सुरुवातीच्या काळात त्यांच्या मुलांचा या गोष्टीला प्रचंड विरोध होता. सलमाने देखील वडिलांचं हेलनसोबतचं नातं स्वीकारलं नव्हतं. “लहानपणी त्यांच्यात वैर होतं. त्यांनी तेच केलं जसं तिची आई वागत होती, गोष्टी सुरळीत व्हायला बराच वेळ लागला, पण नंतर सगळं ठीक झालं,” असं त्यांनी म्हटलं होतं.

अभिनय सोडून केली शेती, चार वर्षांची मेहनत पुरात वाहून गेल्याने अभिनेता झाला कर्जबाजारी, म्हणाला, “मी २० एकर…”

सलीम आणि सलमा यांची मुलं सलमान खान आणि अरबाज खान यांनी त्यांच्या वडिलांच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल आणि त्याचा त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम झाला याबद्दल भाष्य केलं होतं. १९९० मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता, “माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न केल्यावर माझी आई खूप दुखावली होती. जेव्हा ती माझ्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहत असायची, तेव्हा मला त्यांचा तिरस्कार वाटायचा.”

प्रसिद्ध अभिनेत्रीने २० वर्षांनी सांगितलं सिनेसृष्टी सोडण्याचं कारण; म्हणाली, “चित्रपटाच्या अभिनेत्याने मला त्याच्या खोलीत…”

यानंतर सलीम यांनी सलमानला सांगितलं होतं की पुन्हा लग्न केल्यानंतरही ते आपली पहिली पत्नी मुलांच्या जवळ असतील. काही काळाने त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. “वडिलांनी आम्हाला समजावून सांगितलं होतं की ते अजूनही आईवर खूप प्रेम करतात आणि ते त्यांच्याजवळच राहतील. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो आणि हेलन आंटीला स्वीकारायला आम्हाला बराच वेळ लागला. आता त्या आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत,” असं सलमान खान म्हणाला होता.

अनेक दशकांनंतर अरबाजने ‘इ-टाइम्स’शी बोलताना वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. “जेव्हा या गोष्टीवरून कुटुंबात बदल होत होते, तेव्हा मी खूप लहान होतो. पण मला आठवतं की वडिलांनी आम्हाला कधीही हेलन यांच्यावर आमच्या आईइतकं प्रेम करण्यास सांगितलं नाही. ते म्हणाले होते की ‘तुम्ही हेलनला आदर द्यावा, इतकीच माझी अपेक्षा आहे, कारण कारण ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे हे तुम्हाला स्वीकारावे लागेल’,” असं अरबाजने सांगितलं होतं.

दरम्यान, सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाजशी संवाद साधताना हेलन व त्यांच्या नात्याल भावनिक अपघात संबोधलं होतं. “ती तरुण होती, मीही तरुण होतो. मी ते जाणीवपूर्वक केलं नव्हतं. हा एक भावनिक अपघात होता, जो कोणासोबतही घडू शकतो,” असं ते म्हणाले होते.