Video : जेव्हा चाहताच सईसाठी ठरतो खलनायक

एका चाहत्याचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे.

date with saie
सई ताम्हणकर

सेलिब्रिटी म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. पण सेलिब्रिटीसोबत चित्रपट करण्यासाठी वेडा झालेला चाहता त्याच्या जीवावर उठल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? अभिनेत्री सई ताम्हणकरची पहिलीवहिली वेब सीरिज याच कथानकावर आधारित आहे. ‘डेट विथ सई’ असं या वेब सीरिजचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

थरारशैलीच्या सीरिजमध्ये सई पहिल्यांदाच काम करतेय. त्यामुळे ही वेब सीरिज एक वेगळा अनुभव असल्याचं ती सांगते. एका चाहत्याचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. सईचा एक चाहता कशाप्रकारे तिच्यावर सतत नजर ठेवतो आणि तिला कानोकान खबर न लागता कशाप्रकारे तिच्यावर चित्रपट निर्मिती करतो यावर ही वेब सीरिज आधारित आहे. त्या चित्रपट निर्मितीसाठी हा चाहता तिच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडून आणतो. आता जेव्हा सईला या चाहत्याबद्दल समजतं तेव्हा काय घडतं हे या वेब सीरिजमधून पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : ‘2.0’ने तिकीटबारीवर मोडला ‘बाहुबली’, ‘अॅव्हेंजर्स’चा हा विक्रम

या वेब सीरिजमध्ये सईसोबतच रोहित कोकाटे मुख्य भूमिका साकारत आहे. यासोबतच अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, श्रेया बुगडे, गिरीजा ओक आणि पूजा ठोंबरे यांच्याही भूमिका आहेत. निखिल शेठ निर्मित ही वेब सीरिज येत्या ५ डिसेंबरपासून ZEE5 ही सीरिज प्रसारित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Date with saie trailer released starring sai tamhankar premiering 5th december on zee5 india

ताज्या बातम्या