‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येत पात्राला सध्या घरोघरी पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच यामधील अहिल्यादेवींचं पात्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, त्यांच्याभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरतं. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही वजनदार भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. ‘पारू’ मालिकेचं संपूर्ण कथानक अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं बलाढ्य साम्राज्य आणि गावाकडून आलेली साधीभोळी ‘पारू’ यावर आधारित आहे. 

अलीकडच्या काळात अनेक कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. विविध सामाजिक व राजकीय विषयांवर हे कलाकार उघडपणे भाष्य करतात. अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री मुग्धा कर्णिक देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक जीवनात येणारे अनुभव, शूट डायरीज ती इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत असते. मुग्धाने नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टा स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने एका नामांकित बँकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. एटीएम (ATM) मधून पैसे काढल्यावर फाटलेल्या नोटा आल्या असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच या पोस्टसह तिने एक फोटो देखील शेअर केला आहे.

unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Lakhat Ek Amcha Dada new marathi serial coming soon in zee marathi
‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ नंतर ‘झी मराठी’ लवकरच येतेय ‘ही’ नवी मालिका, पाहा जबरदस्त प्रोमो
Navri Mile Hitler La femme raqesh Bapat vallari viraj Sharmishtha Raut tejas desai dance on nacha ga ghuma song
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे-लीलाचा ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, सोबतीला होते निर्माते; पाहा व्हिडीओ
subodh bhave new marathi serial tu bhetashi navyane with shivani sonar
‘तू भेटशी नव्याने’ : सुबोध भावेची नवीन मालिका! शिवानी सोनारसह साकारणार प्रमुख भूमिका, जबरदस्त प्रोमो प्रदर्शित
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
tula shikvin changlach dhada fame shivani rangole
मास्तरीणबाईंच्या ऑफस्क्रीन कुटुंबाला पाहिलंत का? शिवानी रांगोळेने शेअर केला लग्नातील खास फोटो

हेही वाचा : Video : ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’, माधुरी दीक्षितसह अंकिता लोखंडेचा जबरदस्त डान्स; म्हणाली, “मॅम मी तुमची…”

मुग्धा कर्णिकची पोस्ट चर्चेत

मुग्धा कर्णिकने तिच्या पोस्टमध्ये फाटलेल्या नोटांचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री लिहिते, “एका नामांकित बँकेच्या एटीएममधून आज अशाप्रकारच्या नोटा आल्या. याबद्दल त्यांच्याकडे तक्रार किंवा विचारणा करायची असल्याला तर, कस्टमर केअर नंबर सुद्धा सुरू नाही. आता ही समस्या मी कशी सोडवू? त्यांना फोन केल्यावर तक्रार निवारण करण्याचे विशिष्ट विभाग असतात त्याच तुमची समस्या समाविष्ट नसेल तर पुढे काहीच होत नाही. #needtochangemybank (मला बँक बदलण्याची गरज आहे)”

हेही वाचा : श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जंक्शनला देणार दिवंगत अभिनेत्रीचं नाव

mugdha
मुग्धा कर्णिकची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, ‘पारू’ मालिकेत काम करण्याआधी मुग्धा ‘झिम्मा’, ‘स्वाभिमान’, ‘होम स्वीट होम’ या मालिकांमधून तर, रंगभूमीवर काही नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता सध्या ती साकारत असलेल्या अहिल्यादेवींच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे.