तामिळनाडूची अनुकृती वास ‘फेमिना मिस इंडिया २०१८’ची मानकरी ठरली आहे. मुंबईतल्या एनएससीआय स्टेडियममध्ये ही ‘मिस इंडिया’ स्पर्धा पार पडली. देशातल्या विविध राज्यांमधून आलेल्या ३० सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा रंगली होती. अवघ्या १९व्या वर्षी अनुकृतीने ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला आहे.

अनुकृती तामिळनाडूमधील लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात रस आहे. ती अॅथलीटसुद्धा आहे. ‘मला टॉयबॉयसारखं राहायला आवडतं. त्याचप्रमाणे साहसी खेळ आणि बाईक चालवणं खूप आवडतं,’ असं ती म्हणते. यासोबतच विविध ठिकाणी फिरण्यात, नवनव्या गोष्टी शिकण्यात ती पुढाकार घेते.

https://www.instagram.com/p/BiwGZD3h8nU/

https://www.instagram.com/p/BjrYF_IhyZt/

वाचा : अक्षय कुमार साकारणार पृथ्वीराज चौहान यांनी भूमिका

‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या प्रश्नोत्तर फेरीत १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत मिस इंडिया दिल्ली, मिस इंडिया हरियाणा, मिस इंडिया झारखंड, मिस इंडिया आंध्र प्रदेश आणि मिस इंडिया तामिळनाडू या पाच जणींची निवड झाली होती. विजेती निवडण्यासाठी परीक्षकांनी ‘सर्वोत्तम शिक्षक कोण? यश की अपयश?’ हा प्रश्न विचारला होता.