सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठ्या संघर्षाअंती लोकप्रियता मिळाली. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही खूप मेहनत करावी लागली. गॉडफादर नसताना या क्षेत्रात येण्यासाठी खूप धडपड करावी लागते. असाच एक लोकप्रिय अभिनेता व गायक आहे, ज्याने पहिल्या अल्बमसाठी पैसे गोळा करण्यासाठी तीन नोकऱ्या केल्या. कॅनडात फरशी पुसली आणि वर्तमानपत्रं टाकण्याचं कामही केलं. हा अभिनेता व गायक म्हणजे गिप्पी ग्रेवाल आहे. आता लाखो फॉलोअर्स असलेला गिप्पी एकेकाळी सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.

पंजाबी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गिप्पी ग्रेवाल आपल्या पत्नीसह कॅनडामध्ये राहायचा, तिथे तो पैसे कमवण्यासाठी तीन नोकऱ्या करत असे. त्याने ‘मॅशेबल’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला, “मी तीन नोकऱ्या करायला सुरुवात केली. मी सकाळी वृत्तपत्रं टाकायचो, मग मी या कारखान्यात ८ ते ९ तास काम करायचो जिथे मी मार्बलसारख्या साहित्यापासून विटा तयार करायचो. मी सिमेंटचे काम करायचो आणि ते खूप कठीण काम होतं. मग रात्री, मी आणि माझी पत्नी साफसफाईची कामं करायचो. व्हँकुव्हरमधील क्रिस्टल मॉलमधील फूड कोर्टमध्ये आम्ही प्लेट्स साफ कर करायचो आणि फरशी पुसायचो,” असं गिप्पी म्हणाला होता.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश

‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…

तो पुढे म्हणाला, “मी दिवसा नोकरी करत होतो, माझी पत्नी सबवेमध्ये सँडविच बनवायची. बाकीच्या दोन नोकऱ्या आम्ही दोघे शेअर करायचो. मी जायचो आणि सकाळी घराबाहेर वर्तमानपत्रं टाकायचो, माझी पत्नी गाडी चालवत असे. पण मला या सगळ्या नोकऱ्या करताना आनंद व्हायचा,” असं गिप्पीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. इतकंच नाही तर ६५०० रुपयांसाठी तो कॅनडात वेटर म्हणून काम करायचा.“मी कॅनडामध्ये वेटर म्हणून काम करायचो आणि दिल्लीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केलं. मी गाड्याही धुतल्या आहेत. मला कोणत्याही कामाची लाज वाटत नाही. मी सर्व काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करायचो,” असं गिप्पी म्हणाला होता.

मामा सुपरस्टार असल्याचा काहीच फायदा झाला नाही, गोविंदाच्या भाचीचा खुलासा; म्हणाली, “मी चार वर्षांपासून त्यांना…”

पहिला अल्बम ‘चक्ख लई’ लाँच केल्यावर त्याने गायक म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले, तो हिट झाला. त्यानंतर त्याचे ‘आजा वे मित्रा’, ‘मेले मित्रान दे’, ‘फुलकारी २’ आणि इतर अनेक अल्बम आले. यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मग त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि २०१० मधील ‘मेल करादे रब्बा’ या चित्रपटातून पदार्पण केले. हा सिनेमा त्याने काहीच मानधन न घेता केला होता. मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘जिन्हे मेरा दिल लुटेया’ हा होता. तो हिट ठरला आणि त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याने ‘कॅरी ऑन जट्टा’, ‘सिंग व्हर्सेस कौर’, ‘द अनटोल्ड स्टोरी’सह इतर चित्रपट केले.

सनी लिओनीने दिली पोलीस भरती परीक्षा? बोल्ड फोटो असलेलं प्रवेश पत्र व्हायरल झाल्याने गोंधळ

२०१६ मध्ये, त्याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस हंबल मोशन पिक्चर्स सुरू केले आणि अरदास चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि बॉक्स ऑफिसवरही तो चांगलाच यशस्वी ठरला. अलीकडेच, गिप्पीने १०० कोटी रुपये कमावणारा पहिला पंजाबी चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’ दिला. अनेक हिट चित्रपटांसह, गिप्पी ग्रेवाल पंजाबी सिनेमाचा सुपरस्टार बनला आहे. पंजाबी चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता तो आहे. तो प्रति चित्रपट ५ कोटी रुपये कमावतो. तो आलिशान जीवन जगतो आणि त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत. त्याची एकूण संपत्ती १६३ कोटी रुपये आहे. यासंदर्भात ‘डीएनए’ ने वृत्त दिलंय.

दरम्यान, तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जट्ट नू चुडैल तकरी’च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमात गिप्पी ग्रेवाल व्यतिरिक्त सरगुन मेहता आणि रूपी गिल यांच्याही भूमिका आहेत आणि १५ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.