पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या ती भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह बरोबर सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. वीणाने हरभजनच्या ट्विटवर आक्षेप घेत प्रतिक्रीया दिली होती. या प्रतिक्रीयेची हरभजनने ट्विटच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भाषण केले होते. अणुयुद्धाचा संदर्भ देऊन केलेल्या या भाषणावर हरभजन सिंहने प्रतिक्रीया दिली होती. या प्रतिक्रीयेवर आक्षेप घेत हरभजनने लिहलेल्या इंग्रजीची विणाने खिल्ली उडवली होती. "इमरान खान यांनी आपल्या भाषणात शांती आणि संयमाची भाषा केली आहे. तुला एवढे साधे इंग्रजी कळत नाही का?" अशा शब्दात वीणा मलिकने हरभजनच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. परंतु गंमतीशीर बाब म्हणजे वीनाने हरभजनची खिल्ली उडवण्यासाठी वापरलेल्या इंग्रजी शब्दांमधील व्याकरणात काही चूका होत्या. या चूकांवरुन आता हरभजनने वीणाची खिल्ली उडवली आहे. At UNGA speech, there were indications for India of potential nuclear war. As a prominent sportsperson, Imran Khan’s choice of words 'bloodbath' 'fight to the end' will only increase hatred between the two nations. As a fellow sportsperson I expect him to promote peace — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 2, 2019 PM Imran khan DID talk about peace in his speech.He talked about the reality and the horror that will surly occur when the curfew is lifted and sadly there's gonna be a bloodbath.He clearly states that it’s not a threat but a fear Don’t you understand English? @harbhajan_singh — VEENA MALIK (@iVeenaKhan) October 7, 2019 What do u mean by surly? Oh is it surely ??lo ji dekho yeh Angreji Inki.. chill pill next time try and read before u put something in English — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 8, 2019 हरभजनने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या संपूर्ण वादावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भारतीय नेटकऱ्यांनी वीणा मलिकची खिल्ली उडवली आहे. तर पाकिस्तानी नेटकऱ्यांनी हरभजन सिंहच्या प्रतिक्रीयेवर आपला आक्षेप दर्शवला आहे. वीणा मलिक नेहमीच सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असले. काही दिवसांपूर्वी विणा भारतीय चांद्रयान मोहिमेवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चर्चेत होती.