प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजांची मुलगी आणि पार्श्वगायिका भवतारिणी यांचं निधन झालं. कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. २६ जानेवारी म्हणजेच आज त्यांचा पार्थिव चेन्नईत आणण्यात येईल. त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता त्याचे उपचार करण्यासाठी त्या श्रीलंकेला गेल्या होत्या. २५ जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या होत्या भवतारिणी

वयाच्या ४७ व्या वर्षी भवतारिणी यांनी जगाचा निरोप घेतला. भवतारिणी या संगीतकार इलैयाराजा यांच्या कन्या तर कार्तिक राजा आणि युवान शंकर राजा यांची बहीण होत्या. त्यांना भारती सिनेमातील मयिल पोला पोन्नू ओन्नू या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.इलैयाराजा यांच्या कन्या भवतारिणी या पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या. त्यांना यकृताच्या कर्करोगाने ग्रासलं होतं. त्या श्रीलंकेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

विविध चित्रपटांसाठी गायन आणि संगीत

भवतारिणी यांनी रासैय्या नावाच्या सिनेमातून पार्श्वगायन सुरु केलं. तसंच इलैयाराजा आणि कार्तिकराजा तसंच युवान शंकर राजा यांच्यासाठीही त्यांनी गाणी म्हटली. संगीतकार देवा आणि सिरपी यांच्यासाठीही गाणी गायली होती. २००२ मध्ये ‘मित्र, माय फ्रेंड’ या रेवतीच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या सिनेमाला संगीत दिलं. तसंच ‘फिर मिलेंगे’ या सिनेमालाही त्यांनी संगीत दिलं. मायनिधी हा त्यांचा शेवटचा अल्बम ठरला. कधालुक्कु मरियाधई, भारती, अजागी, फ्रेंड्स, पा, मनकथा आणि अनगेन यांसारख्या तमिळ सिनेमांसाठी त्यांनी गायन केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ilaiyaraaja daughter and national award winning singer bhavatharini passes away scj
First published on: 26-01-2024 at 08:45 IST