‘पद्मावती’च्या वादामुळे अनेक नव्या चित्रपटांनाही सेन्सॉरने मंजूरी दिलेली नाही. परिणामी या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना जुनेच चित्रपट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. यामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांना फायदा होत आहे. परंतु, या सगळ्यात चित्रपटगृहाच्या मालकांकडून हिंदी चित्रपटांचा फायदा करून देण्यासाठी लबाडी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाला कात्री लागत आहे.

TOP 10 NEWS वाचा : विराटने मानुषीच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरापासून शोभा डेंच्या ट्विटपर्यंत

“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?
actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’
Blockbuster south movies
आधी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, नंतर ओटीटी रिलीजसाठी घेतले कोट्यवधी; तुम्ही पाहिलेत का ‘हे’ बॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपट
Malhar marathi movie
लोकप्रिय हिंदी अभिनेता मराठी सिनेमात झळकणार, ‘या’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी, पहिलं लूक पोस्टर प्रदर्शित
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Lifeline movie
‘लाईफ लाईन’मध्ये दिसणार जुने रितीरिवाज अन् आधुनिक विज्ञानातील संघर्ष, सिनेमात दिग्गज मराठी कलाकारांची फौज
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…

नेरुळ येथील एका चित्रपटगृहात प्रेक्षकांना चक्क ‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाऐवजी राय लक्ष्मी हिच्या ‘ज्युली २’चे तिकीट देण्यात आले. या प्रकारामुळे मराठी चित्रपटांच्या नावे जमा होणारा गल्ला थेट हिंदी चित्रपटांना जातोय का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रीकर विभागाचे उपायुक्त दिलीप देशमुख नेरुळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘दशक्रिया’ चित्रपट पाहायला गेले होते. त्यावेळी त्यांना ‘ज्युली २’ ची तिकीटे देण्यात आली. रात्री ९ वाजता या चित्रपटाचा शो होता. देशमुख चित्रपटाला पोहोचले, त्यांना प्रवेशही मिळाला. पण मध्यांतरात सहज म्हणून तिकीट तपासले असता आपल्याला ‘ज्युली २’ चित्रपटाची तिकीटं मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी विचारणा करण्यासाठी देशमुख तिकीट काऊंटरवर गेले, पण त्यावेळी काऊंटर बंद होते. पण, यासारख्या घटना याआधीही घडल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे या प्रकारानंतर चित्रपटांच्या नावाने जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या गल्ल्यावर शंका उपस्थित होत आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय का?

देशमुख यांनी ज्या चित्रपटासाठी पैसे मोजले तोच चित्रपट त्यांना पाहायला मिळाला. मात्र, तिकीटांची अदलाबदल केल्याने ‘दशक्रिया’ चित्रपटाचा गल्ला ‘ज्युली २’ या हिंदी चित्रपटाच्या नावावर जमा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.