दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटातील ‘कामचोर’ अथवा कामचुकार नायक? तो आपल्याला फिल्मक्राफ्टच्या ‘कामचोर’ (१९८२) या चित्रपटात पाहायला मिळाला आणि या चित्रपटाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला देखिल. राकेश रोशन अभिनयाकडून चित्रपट निर्मितीकडे वळला आणि ‘आप के दीवाने’ (दिग्दर्शक सुरेंद्र मोहन)  नंतर त्याने ‘कामचोर’ची निर्मिती केली. ‘सुभोद्यम’ या तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी हा हिंदीत रिमेक केला. त्यांच्याच ‘सरगम’च्या यशाने हिंदी चित्रपटात आलेल्या जयाप्रदाला त्यांनी राकेश रोशनची नायिका केले.

‘कामचोर’ निर्मितीवस्थेत असताना त्याची विशेष चर्चा नव्हती. ते दिवस अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ नायकाचा विलक्षण प्रभावातून हिंदी चित्रपट थोडा थोडा बाहेर पडण्याचे होते तरी ‘कामचोर’ त्याचा एक भाग ठरेल असे वाटत नव्हते, म्हणूनच की काय हा चित्रपट मेन थिएटरला नियमित खेळास प्रदर्शित न करता तो नाँव्हेल्टीत मँटीनीला लावला. पण फारशी अपेक्षा नसणारे चित्रपट अनेकदा सुखद धक्का देतात, तसे ‘कामचोर’चे झाले.

allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

तात्कालिक समीक्षकांनी चित्रपटाच्या गीत (इंदिवर यांची) आणि संगीत (राजेश रोशन) याचे विशेष कौतुक केले. यातील गाणी श्रवणीय असल्याने चित्रपट सुपरहिट ठरला. ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘तुमसे बढकर दुनिया मे’, ‘मल दे गुलाल मोहे आई होली आई रे…’ गाण्यांच्या लोकप्रियतेवर चित्रपट यशस्वी ठरतो याचे हे उत्तम उदाहरण. विशेष म्हणजे राकेश रोशन ‘कामचोर’च्या यशाने इतका प्रेरित झाला की, ‘खुदगर्ज’पासून दिग्दर्शनात उतरताना त्याच्या ‘के’ आद्याक्षराने सुरू होणारे चित्रपट ही आपली ओळख निर्माण केली.

‘कामचोर’ नायक कसा आहे? काही कामधंदा नसणाऱ्या नायकाच्या प्रेमात सुदैवाने एक श्रीमंत युवती पडते, तिला त्याच्याशीच लग्न करायचेय आणि त्यांचे लग्न ते होतेदेखिल आणि तो घरजावई बनतो, त्यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडतात… पटकथा लेखक जैनेंद्र जैन यांनी कौटुंबिक, सामाजिक नाट्य खुलवले. या चित्रपटात तनुजा, डॉ. श्रीराम लागू, सुरेश ओबेरॉय, सुजीतकुमार, भगवानदादा इत्यादींच्या भूमिका होत्या. ‘कामचोर’च्या यशाने जयाप्रदाची हिंदीतील वाटचाल अधिकच व्यवस्थित सुरू झाली आणि दक्षिणेकडील भाषिक चित्रपटापासून दूर होत गेली. तर राकेश रोशनला नायक म्हणून या यशाचा फारसा लाभ झाला नसला तरी तो निर्माता म्हणून स्थिरावण्यास फायदा झाला.