आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. तब्बल सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशाताईंनी आज ८७व्या वर्षात पदार्पण केलंय. दरम्यान जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या लहान बहिणीला अनोख्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आशातालईंसोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“नमस्कार, माझी लहान बहिण आशा भोसले हिचा आज वाढदिवस आहे. ती खूप सुंदर गाणं गाते, संपूर्ण जग तिला ओळखतं. अशीच सुंदर गाणी गात राहा, आनंदी राहा, माझे आशिर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन लता मंगेशकर यांनी आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटसोबत त्यांनी एक दोघांचा एक दुर्मिळ फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

आशा भोसले यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. वडील दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाल्यापासून त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे.

नौशाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, पंजाबी, तमिळ, उर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. अनेक अभिनेत्रींच्या पडदायावरील सुरेल आवाजामागचं रहस्य म्हणजे आशा भोसले. असे नजाकतीचे सूर आळवणाऱ्या आशाताई आजही तितक्याच हरहुन्नरी आणि उत्साही आहेत.