काही दिवसांपूर्वी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सुरु असणाऱ्या व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये सर्वकाही सुरळीत चाललेलं असताना सोशल मीडियावर प्रिया वरियर नावाचं वादळ आलं. इथे प्रियाला वादळ म्हणण्याचं कारण की, अवघ्या काही सेकंदांसाठी तिची झलक पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मुलगी म्हटलं की चार हात लांब राहण्याऱ्या बऱ्याचजणांची प्रतिज्ञाही प्रियाने मोडित काढली. मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर फक्त एका गाण्यामुळे इतकी प्रसिद्ध होईल याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. सोशल मीडिया हे अनिश्तितेचं जग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पण, ज्या फेसबुकच्या माध्यमातून प्रियाच्या चाहत्यांचा आकडा वाढण्यास मदत झाली त्याच फेसबुकच्या संस्थापकाला म्हणजे मार्क झकरबर्गला प्रियाच्या भुवया उंचावण्याचा फटका बसला आहे.

‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या प्रियाच्या फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने वाढला. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच वर्षांपासून प्रकाशझोतात असणाऱ्या काही चेहऱ्यांच्या फॉलोअर्सचा आकडा पाहता प्रियाच्या फॅन फॉलोइंगमुळे त्यांना धास्ती लागून राहिली असणार यात शंका नाही. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार प्रिया ही जगभरातील सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स मिळवणारी तिसरी सेलिब्रिटी ठरली होती. आता तर तिने फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाही मागे टाकलं आहे.

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

इन्स्टाग्रामवर सध्याच्या घडीला मार्क झकरबर्गच्या फॉलोअर्सची संख्या चाळीस लाखांच्या जवळपास आहे. तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या पाहता नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. कारण तिच्या फॉलोअर्सचा आकडा ४५ लाखांपर्यांत पोहोचला आहे. फॉलोअर्सच्या या शर्यतीत प्रियाने बॉलिवूड सेलिब्रिटी सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ यांच्यासोबतच मल्याळम सुपरस्टार अभिनेता मोहनलाल यांनाही मागे टाकलं आहे.

https://www.instagram.com/p/BfaqIlJjCaJ/

वाढती लोकप्रियता आणि सध्या तिचाच ट्रेंड पाहता येत्या काळात प्रियाच्या फॉलोअर्सचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. अवघ्या ९१ पोस्ट्सच्या बळावर प्रियाने इतके चाहते कमावले आहेत. पदार्पणापूर्वीच प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीकडेच आता कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

पाहा : VIDEO: बर्लिनकरही म्हणाले ‘कुछ कुछ होता है’

https://www.instagram.com/p/BfQK-eZja24/