एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी यांवरून वाद सुरू असताना आता मराठी सिनेसृष्टीतील कंपूशाहीबाबत कलाकार व्यक्त होत आहेत. “मराठी सिनेसृष्टीत एकी नाही. इथे एकमेकांचं काम सेलिब्रेट केलं जात नाही. कंपूशाहीमुळे मराठी सिनेमा वाढलेला नाही”, असं मत लेखक क्षितिज पटवर्धनने नोंदवलंय. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत तो बोलत होता. मराठी सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर फारसे का येत नाहीत, सिनेसृष्टीतील कंपूशाही याविषयी त्याने बेधडक मतं मांडली आहेत.

पाहा व्हिडीओ-

नाटककार, सिनेमा पटकथा-संवाद लेखक, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणारा लेखक म्हणून क्षितिजची ओळख आहे. त्याची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा- तोकडं मानधन ते मराठी सिनेसृष्टीतली कंपूशाही यांविषयी लेखक क्षितिज पटवर्धनची बेधडक मुलाखत