‘सुभेदार’ हा चित्रपट गेले अनेक महिने खूप चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता विराजस कुलकर्णीने ‘जीवा’ या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आता सुभेदारनंतर कोणती भूमिका साकारणार याबाबत विराजसने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मुलीला परीक्षेला पाठवतो आणि स्वत: गळफास लावून घेतो,” किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “देशातल्या शेतकर्‍यांचं वास्तव…”

विराजस म्हणाला. “मालिका झाली, आता चित्रपट झाला भविष्यात एखाद्या नाटकात काम करण्याची खरंच माझी खूप इच्छा आहे. कारण, माझ्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. प्रेक्षकांसमोर लाइव्ह सादरीकरण करण्याची मजा खरंच खूप वेगळी असते. आजवर मी प्रायोगिक रंगभूमीवर काम केल आहे. पण, आता व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची मनापासून इच्छा आहे. माझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल लवकरच तुम्हाला कळेल” असंही विराजस म्हणाला.

सुभेदार चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची, मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ यांची आणि अजय पूरकर यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ८.७५ कोटींची कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor virajas kulkarni talk about his next project after subhedar film dpj
Show comments