ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना गेल्या आठवड्यात २०२३ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांचं मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी अभिनंदन केलं. आता त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याने यासंदर्भात पोस्ट केली आहे.

अनिकेत सराफ हा अशोक सराफ व निवेदिता सराफ यांना मुलगा आहे. त्याने इन्स्टाग्रामवर बाबांबरोबरचा एक कोलाज केलेला फोटो शेअर करत त्यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या. “माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जे काही मिळवले आहे, त्याबद्दल आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला त्यांचा अभिमान वाटला आहे. त्यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,” असं कॅप्शन अनिकेतने फोटोला दिलंय.

ajit pawar warns his siblings
“गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका”, अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”
sharad pawar rohit pawar chandrakant patil
“भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘खूप छान फोटो’, ‘अभिनंदन’, ‘तू अगदी वडील अशोक सराफ यांच्यासारखा दिसतोस’, ‘तुझं आणि तुझ्या वडिलांचं खूप अभिनंदन’, ‘मला त्यांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात’, अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.