मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा करून अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. ‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य चित्रपटांमधून अशोक सराफ यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक सराफ यांनी मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना केवळ विनोदीचं नव्हे तर गंभीर भूमिका ते खलनायक अशा अभिनयाच्या विविध बहुरुपी छटा आपल्याला पाहायला मिळाल्या. अशोक सराफ यांना २०२३चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर सध्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : तेजस्विनी पंडितचं नव्या क्षेत्रात पदार्पण! पुण्यात सुरू केला ‘हा’ व्यवसाय, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. “ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ही आनंदाची बातमी आहे. आमचं तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या “अफलातून” नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही “बनवाबनवी” केली नाही, याचा आनंदच आहे. आता मोठ्या “धूमधडाक्यात” त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा, या सदिच्छा…!” अशी एक्स पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळ्या अमृता सुभाषने वेधलं लक्ष; नेसलेली ‘ही’ खास साडी; म्हणाली, “गुजराती…”

जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट

हेही वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर अशोक सराफ यांनी “माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलं आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय पुरस्कारची घोषणा झाल्यावर मराठी कलाविश्वातील सगळ्याच लोकप्रिय कलाकारांनी या दिग्गज कलावंतावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf won maharashtra bhushan award 2023 jitendra awhad shares congratulation x post sva 00
First published on: 31-01-2024 at 11:15 IST