Premium

UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ गाणं पोहोचलं सातासमुद्रापार

baharla-ha-madhmaas-on-uk-radio
'बहरला हा मधुमास' गाण्याची UK मधील रेडिओलाही भुरळ. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट ३० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. अंकुशने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार शिंदेंची लेक सनाने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. सना या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील सनाच्या ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यावरील रील्स व्हायरल होत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता UK मधील रेडिओला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ पडली आहे.

हेही वाचा>> करण जोहरच्या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी, रणवीर सिंग व आलिया भट्टबरोबर करणार काम

UK मधील प्रसिद्ध अशा ‘सॅब्रस’ (SABRAS RADIO) या रेडिओ स्टेशनवर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं वाजवलं जात आहे. अंकुश चौधरी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. “आपल्या मातीतल्या आपल्या मराठी गाण्याची भुरळ सातासमुद्रापार. ‘बहरला हा मधुमास..’ UK मधील आघाडीच्या SABRAS RADIO वर १५ व्या क्रमांकावर वाजू लागलंय,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ गाणं UK मधील रेडिओ स्टेशनवर लागल्याचं समजताच चाहतेही भारावले आहेत. अंकुशच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आनंद व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari shared post kak

First published on: 26-05-2023 at 10:00 IST
Next Story
“कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत