सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेला ‘बॉईज ४’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काल (६ ऑक्टोबर) प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील गौरव मोरेच्या शुद्ध भाषेने आणि अभिनय बेर्डेच्या स्टाइलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या स्टारकास्ट विविध एंटरटेन्मेंट चॅनेलशी बातचित साधत आहेत. अशातच गौरव मोरेचा विमानतळावरील एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आज अचानक पॅकअप नंतर…” प्रसाद ओक याला चाहत्यांनी दिला आश्चर्याचा धक्का, अनुभव सांगत म्हणाला…

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…

अभिनेता पार्थ भालेरावने गौरव मोरेचा विमानतळावरील तो किस्सा सांगितला आहे. ‘मीडिया टॉक मराठी’ या एंटरटेन्मेंट चॅनेलशी बोलत असताना पार्थने गौरवचा किस्सा सांगितला. पार्थ म्हणाला की, “मुंबईवरून गौरव युकेसाठी येत होता. तेव्हा युकेला इमिग्रेशनच्या वेळेस त्याला विचारलं की, ‘तुम्ही इथे का आला? तुमचा इथे येण्याचा उद्देश काय आहे?’ तर गौरव म्हणाला, ‘शूटिंग.’ हे ऐकताना त्याला अडवलं. गौरवबरोबरच्या या घटनेनंतर संपूर्ण चित्रपटाच्या टीमला सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग म्हणा किंवा फिल्मोग्राफी म्हणा फक्त शूटिंग म्हणून नका.”

हेही वाचा – “मी त्याच्यावर खूप प्रेम करते” अभिनेत्री केतकी माटेगावकरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान, गौरव मोरेसाठी ऑक्टोबर महिना खूप खास आहे. कारण एकाच महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कालच त्याचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ आणि २७ ऑक्टोबरला ‘लंडन मिसळ’ हे गौरवचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शिवाय गौरव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित असलेला ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyz 4 fame parth bhalerao share gaurav more airport incident pps
First published on: 07-10-2023 at 10:29 IST