Cannes Film Festival : ‘लापता लेडीज’मधील मंजू माई असो किंवा ‘मडगाव एक्स्प्रेस’ चित्रपटातील कंचन कोमडी अभिनेत्री छाया कदम यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. याशिवाय त्यांचे एक नव्हे तर दोन चित्रपट यंदा कान्समध्ये झळकणार आहेत. यातील ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यात पार पडलं. या भारतील चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आलं.

मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या कान्स सोहळ्यामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाचा प्रीमियर कान्स सोहळ्यात करण्यात आला. यासाठी छाया कदम या खास परदेशात रवाना झाल्या आहेत.

हेही वाचा : “एकजूट नाही, लॉबिंग करतात”, पुष्कर जोगने मराठी इंडस्ट्रीबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “कोणाचीही साथ नाही…”

छाया कदम यांनी कान्स सोहळ्याला पहिल्याच दिवशी आईची नथ आणि साडी नेसून उपस्थिती लावल्याची पोस्ट शेअर केली होती. यानंतर चित्रपटाच्या स्क्रीनिंगला देखील त्यांनी खास देसी लूक करून नाकात त्यांच्या आईची नथ परिधान केली होती. त्यांच्या या भरजरी नथीने कान्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : “जनावरांसारखं वागवलं जातं”, ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने मांडली इंडस्ट्रीतील व्यथा; म्हणाली, “कलाकारांना छोट्याशा घाणेरड्या खोलीत…”

छाया कदम यांचे सिनेमा

छाया कदम यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात नाटकापासून केली. मोठ्या संघर्षानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लापता लेडिजमधील मंजू माईच्या भूमिकेने त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळवून दिली. आजवर त्यांनी ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘सरला एक कोटी’, ‘न्यूड’, ‘रेडू’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा : “अचकट विचकट कमेंट्स वाचण्यापेक्षा…”, वयावरून ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

दरम्यान, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्याने सध्या या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये कनी कुसरुती, छाया कदम, दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.