सिनेसृष्टीतील झगमगाटात कास्टिंग काउच, मानधनात तफावत, थकबाकी अन् भेदभाव या गोष्टीही घडत असतात, मात्र खूप कमी कलाकार त्याबद्दल बोलतात. ‘पंचायत’ फेम अभिनेत्री सुनीता राजवरने इंडस्ट्रीतील तिच्या आणि तिच्यासारख्या इतर कलाकारांशी होत असलेल्या भेदभावाचा खुलासा केला आहे. छोट्या भूमिका करणाऱ्या कलाकारांना जनावरांसाठी वागणूक मिळते, असं तिने सांगितलं. याच कारणाने आपण अभिनयातून ब्रेक घेतला होता, असा खुलासाही तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रूट इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली की कलाकारांना बऱ्याचदा टाइपकास्ट केलं जातं, ज्यामुळे त्यांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळतात. खूपदा कलाकार पैशांसाठी एकाच प्रकारच्या भूमिका करतात. “हे वाईट आहे, पण हेच सत्य आहे,” असं सुनीता म्हणाली.

सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घटस्फोट घेतल्यावर बदललं दारावरचं नाव; नव्या नेमप्लेटसह शेअर केले खास Photos

मुख्य व सह-कलाकारांमध्ये होतो भेदभाव

इंडस्ट्रीमध्ये मुख्य कलाकार आणि सहाय्यक कलाकारांमध्ये भेदभाव केला जातो, आरोप सुनीताने केला. मुख्य कलाकारांना सर्व सुविधा दिल्या जातात, तर सहाय्यक कलाकारांना वाईट वागणूक दिली जाते, असं ती म्हणाली. तसेच मुख्य कलाकारांना त्यांच्या सोयीनुसार कॉल टाइम दिला जातो, असंही तिने नमूद केलं. “ज्या प्रकारे भेदभाव केला जातो तो अपमानास्पद आहे,” असं ती म्हणाली. मुख्य कलाकारांना महिन्यात ३० दिवस काम करावं लागतं, कधीकधी त्यांना दिवस-रात्र काम करावं लागतं, अस तिने सांगितलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची सख्खी बहीण दिसते अभिनेत्रींपेक्षा सुंदर, पाहा स्नेहाचे खास Photos

मुख्य कलाकारांच्या शूटवेळी थांबवून ठेवतात

सुनीता म्हणाली, “तुम्ही एकाही कलाकारासोबत काम करत नाही हे तुम्हाला माहीत असेल तर त्यांना बसवून ठेवायची काय गरज आहे? असं वाटतं जणुकाही तुम्हाला इतरांचा अपमान करायचा आहे. खरं तर मुख्य कलाकारांची काळजी घेतली जाते, त्यांच्या खोल्या स्वच्छ असतात, त्यांच्यासाठी फ्रीज असतं, मायक्रोवेव्ह असतो. पण आमच्यासारख्या कलाकारांना छोट्याशा घाणेरड्या खोलीत राहावं लागतं. ते ३-४ जणांना एकत्र राहायला सांगतात. छताला गळती असते, बाथरूम अस्वच्छ असतात आणि बेडशीट घाण असतात, हे सगळं बघून मला खूप वाईट वाटायचं.”

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

आपल्याबरोबर खूपदा असं घडल्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता, असंही सुनीता यांनी सांगितलं. “जेव्हा तुम्ही छोट्या भूमिका करता तेव्हा तुम्हाला मान मिळत नाही आणि तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. तुम्हाला जनावरांसारखं वागवलं जातं, जे खूप वाईट आहे,” असं सुनीता म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayat fame sunita rajwar talks about discrimination in industry between lead actor and side actors hrc
First published on: 24-05-2024 at 16:28 IST