Premium

“अजिबात टेन्शन नको घेऊस”, ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ‘बॉईज ४’च्या सेटवर गौरव मोरेनं केली ‘अशी’ मदत

‘हास्यजत्रा’ फेम निखिल बने आणि गौरव मोरेमध्ये आहे ‘असं’ बॉण्डिंग, अभिनेता खुलासा करत म्हणाला…

maharashtrachi hasyajatra fame nikhil bane and gaurav more
निखिल बने आणि गौरव मोरे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. अभिनेता निखिल बनेलाही या कार्यक्रमामुळे घराघरांत एका वेगळी ओळख मिळाली. लवकरच हा विनोदवीर बहुचर्चित ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘बॉईज ४’मध्ये निखिलच्या साथीला गौरव मोरेदेखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

‘बॉईज ४’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी निखिलने गौरवने त्याला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कशी मदत केली याविषयी सांगितलं. निखिल बने म्हणाला, “गौरव आणि माझं हास्यजत्रेत एक बॉण्डिंग झालंच आहे पण, आता चित्रपटात सुद्धा आमचं कमाल बॉण्डिंग जमलं. पहिलाच सिनेमा असल्याने मला सुरूवातीला दडपण होतं परंतु, या सगळ्यात मला गौरवने खूप सांभाळून घेतलं.”

हेही वाचा : Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…

“गौरव मला नेहमी सांगायचा तुझा पहिला चित्रपट आहे मला कळतंय…तुला भिती आहे, तू दडपणाखाली आहेस पण, तू अजिबात टेन्शन नको घेऊस काही वाटलं तरी मी आहे. आपण एकत्र रिहर्सल करूया. आम्ही दोघंही वर्कशॉप किंवा शूटिंग संपवून पुन्हा हॉटेलला गेल्यावर प्रत्येक सीन एकत्र वाचायचो. पहिलाच चित्रपट असल्याने मोठी जबाबदारी होती. शेवटी सीन चांगलं होणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.” असं निखिलने सांगितलं.

हेही वाचा : नितीन गडकरींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, प्रदर्शनाची तारीखही ठरली

निखिल पुढे म्हणाला, “गौरवने सांगितल्याप्रमाणे आम्ही सीन एकत्र वाचले, मेहनत घेतली आणि बॉण्डिंग खरंच खूप भारी आहे. यापूर्वी गौरवने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेलं असल्याने त्याला अनेक गोष्टी माहिती होत्या.” दरम्यान, बहुचर्चित बॉईज ४ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame nikhil bane shared his working experience of boys 4 movie with gaurav more sva 00

First published on: 06-10-2023 at 14:23 IST
Next Story
Video “पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही का?” मराठी अभिनेत्याला दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज