अभिनेत्री शिवानी सुर्वेने अभिनेता अजिंक्य ननावरे याच्याशी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मेहंदी, हळदी, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा शिवानी-अजिंक्यचा झाला. नुकताच शिवानीने लग्नातचा Unseen व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवानी सुर्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नातील दोघांची एन्ट्री आणि खास, महत्त्वाचे क्षण पाहायला मिळत आहेत. मंगलाष्टक, सातफेरे, कानपिळी असे सर्व विधी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाच्या Unseen व्हिडीओवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – विद्या बालनने घेतली मुंबई पोलिसात धाव, सोशल मीडिया ठरलंय निमित्त; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरी

शिवानी-अजिंक्यची भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेमुळे झाली. या मालिकेत अजिंक्यची मध्येच एन्ट्री झाली होती. पण त्याच्या एन्ट्रीनंतर ३ महिन्यांनी मालिका बंद झाली. यावेळी दोघांची हाय-हॅलो करण्यापर्यंतचं मैत्री झाली होती. हळूहळू शिवानीला अजिंक्यबाबतीत वेगळं जाणवू लागलं. २०१५-१६च्या दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.

२०१७मध्ये दोघांनी आपल्या नात्यांबद्दल आपापल्या घरी सांगितलं. पण दोन्ही घरातून शिवानी-अजिंक्यच्या नात्याला विरोध दर्शवला. हे फक्त आकर्षण आहे. तुमचे एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहून दाखवा, असं दोघांच्या घरच्यांनी सांगितलं. घरच्यांच्या या सल्ल्यानंतर शिवानी व अजिंक्य लिव्हइनमध्ये राहू लागले. यानंतर चार वर्षांनी दोघांच्या कुटुंबीयांनी नात्याला होकार दिला. त्यानंतर दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.

हेही वाचा – “कुणीतरी येणार येणार गं…”, ‘सुख म्हणजे नक्की असतं’ फेम अभिनेता होणार बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला…

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शिवानी अलीकडेच ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने साकारलेली मनाली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता लवकरच शिवानी भूषण कडूसह  ‘ऊन सावली’  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला स्वप्नील जोशी, प्रसाद ओक असणार आहेत. तसंच शिवानीचा नवरा अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याची ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.