scorecardresearch

Premium

राज ठाकरेंनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास भेट, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…

अमृता खानविलकरला दिवाळीनिमित्त राज ठाकरेंनी पाठवलं खास गिफ्ट, अभिनेत्री म्हणाली…

raj thackeray send diwali gifts to amruta khanvillkar
अमृता खानविलकरला राज ठाकरेंनी पाठवली भेटवस्तू

दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र साफसफाई, रोषणाई व फराळ तयार करण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळीत घराघरांत रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. अनेकजण मोठ्या आवडीने एकमेकांना भेटवस्तू देत असतात. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक मराठी कलाकारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. आता अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केलेल्या भेटवस्तूचा फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : शशांक केतकरने शेअर केला मरिन ड्राइव्ह परिसरातील जोडप्यांचा व्हिडीओ; म्हणाला, “हा गोंधळ…”

yami-gautam-article370
‘आर्टिकल ३७०’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्री यामी गौतमचं चोख उत्तर; म्हणाली, “अशा लोकांना…”
vivek angihotri praised baipan bhari deva movie and kedar shinde
‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
Poonam Pandey Car Collection
Actress Poonam Pandey Car Collection: अभिनेत्री पूनम पांडेचे निधन; ताफ्यात कोणत्या कार? जाणून घ्या…

अभिनयाव्यतिरिक्त उत्तम नृत्यांगणा अशी कलाविश्वात एक वेगळी ओळख अमृताने निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. तिचे ‘अमृतकला’चे डान्स व्हिडीओ चाहत्यांना विशेष आवडतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या चंद्रमुखीला दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून खास भेटवस्तू पाठवण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने या दिवाळी गिफ्टची झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. राज ठाकरेंनी दिलेली भेटवस्तू स्वीकारत अमृताने राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. अमृताने गिफ्टचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “राजसाहेब ठाकरे, शालिनी वहिनी, मिताली व अमित ठाकरे तुम्हाला मनापासून धन्यवाद” असं लिहिलं आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील लहानग्या कार्तिकीने केल्या चकल्या, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

amruta
अमृता खानविलकर

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरत ती बहुचर्चित ‘कलावती’ या चित्रपटाता महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ललिता बाबरच्या बायोपिकमध्येही अमृता काम करणार आहे. ‘चंद्रमुखी’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रसाद ओक आणि अमृता खानविलकरची जोडी ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray send diwali gifts to marathi actress amruta khanvilkar sva 00

First published on: 09-11-2023 at 19:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×