नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी आपला ठसा उमटवला आहे. कलाविश्वात त्यांना सोनपरी म्हणून ओळखलं जातं. आजही त्यांनी आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा लेक विराजस कुलकर्णीने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. अल्पावधीतच विराजस घराघरांत लोकप्रिय झाला आहे. आज लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझा होशील ना’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून विराजस घराघरांत प्रसिद्धीझोतात आला. यामध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता पुन्हा एकदा नाटकामध्ये रमला आहे. ‘गालिब’ या नाटकात विराजस महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसेच स्वप्न बघणं कधीही सोडू नकोस असा सल्ला त्यांनी लेकाला दिला आहे.

हेही वाचा : पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण

“प्रिय विराजस, आज २९ फेब्रुवारी – तुझा वाढदिवस अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात…पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे “तू” आहेस…! जसे कष्ट तू करतो आहेस, त्यावरून हे नक्की, की येणारं वर्ष “तुझं” असणार आहे..असाच निर्मळ रहा…स्वप्नं बघणं सोडू नकोस आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास ही! आम्हा दोघांकडून खूप प्रेम! चार वर्षांनी येणारा तुझा विशेष वाढदिवस नेहमीच विशेष असू दे!” अशी खास पोस्ट मृणाल कुलकर्णींनी केली आहे.

हेही वाचा : “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, पूजा सावंत आणि सिद्धेशने लग्नानंतर पहिल्यांदाच घेतला खास उखाणा

मृणाल कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय विराजसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्याने २०२२ मध्ये शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. तिने देखील लाडक्या नवऱ्याला इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.