सरोगसी हा शब्द आता सर्वसामान्य लोकांमध्ये चांगलाच परिचित झालेला आहे. परंतु, आजही अनेकांना सरोगसी प्रक्रियेचं वैज्ञानिक व भावनिक महत्त्व मान्य नाही. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा नवीन चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते. याशिवाय ट्रेलर लॉन्च झाल्यावर चित्रपटातील आठ गर्भवती महिलांच्या ‘डोहाळे जेवणाचा’चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Samantha Ruth Prabhu in atlees upcoming film with south star allu arjun
ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

हेही वाचा : “फिल्मफेअर पुरस्कार गुजरातला, आता…”, रोहित पवारांनी व्यक्त केली भीती; सरकारवर टीका करत म्हणाले, “गद्दारांनी…”

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या माध्यमातून लेखक राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी समाजातील संवेदनशील विषय मोठ्या पडद्यावर मांडला आहे. चित्रपटातील अभिनेत्रीला गावात फर्टिलिटी सेंटर सुरू करायचे असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इस्टेट एजंट प्रथमेश परब आणि त्याचा मित्र पृथ्वीक प्रताप मदत करतात. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार की त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : “माझे वडील संघी नाहीत”, मुलगी ऐश्वर्याच्या विधानावर रजनीकांत म्हणाले, “तिने संघी हा शब्द वाईट…”

‘डिलिव्हरी बॉय’बद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ”सरोगसीबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत, अनेक ठिकाणी आजही जुनीच विचारसरणी घेऊन लोक जगत आहेत आणि हीच विचारसरणी बदलण्याचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केला आहे. खरंतर, सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, मात्र त्याचे गांभीर्य जाऊ न देता मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही ‘डिलिव्हरी बॉय’मधून केला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने आम्ही हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. ही कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा.”