मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते व उत्तम दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘सेनापती हंबीरराव’, ‘बलोच’, ‘चौक’ अशा एकापेक्षा दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. सध्या प्रवीण तरडे ‘धर्मवीर २’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. याशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर २००९ मध्ये प्रवीण तरडेंनी स्नेहल यांच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

स्नेहल तरडे या सुद्धा कलाविश्वातील उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. लवकरच त्या दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नुकताच स्नेहल यांनी ‘Study of Vedas’ हा अभ्याक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून अंतिम परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलं आहे. याची माहिती खास पोस्ट शेअर करून त्यांनी दिली आहे.

हेही वाचा : Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक

स्नेहल तरडे यांची पोस्ट

‘वेदांचा अभ्यास’

स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम’ या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात ७८ टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा!

हेही वाचा : “मी अलैंगिक आहे का? असा पहिला विचार…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य; ‘त्या’ कवितेबद्दल म्हणाली, “लोक काय म्हणतील…”

हेही वाचा : Video: कुशल बद्रिकेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय विनोदवीराची ‘मॅडनेस मचाएंगे’ हिंदी कार्यक्रमात एन्ट्री, व्हिडीओ आला समोर

दरम्यान, स्नेहल तरडेंनी शेअर केलेली पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुद्धा खास पोस्ट शेअर करत स्नेहल यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर येत्या काळात स्नेहल तरडे अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. त्यांना विविधांगी भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.