प्रिया बापट आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया विविध विषयांवरची तिची मतं ठामपणे मांडत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. प्रियाने आता एका मुलाखतीत फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींबद्दल विधान केलं आहे. मी कधीच फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे, असं तिने सांगितलं आहे.

‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, “मी कधीच फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही. आयुष्यात कधीच नाही. मी टीव्हीवर काम करत असतानाही हीच भूमिका घेतली होती. प्रत्येक रंगाची त्वचा सुंदर असते, त्यामुळे मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा. कोणी ठरवलेत सौंदर्याचे हे निकष?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

पुढे तिने सौंदर्याच्या साचेबद्ध निकषांनुसार विशिष्ट शरीरयष्टीबाबत तिचं मत व्यक्त केलं. “मला शरीरयष्टीबाबतीत (बॉडी टाइप्स) हेच वाटतं. आपण सर्व प्रकारचे बॉडी टाइप्स का स्वीकारत नाही? मी जशी आहे, तसं स्वतःला स्वीकारायला मला खूप वेळ लागला. कारण मी मॉडेल फिगरमध्ये फिट बसत नाही. मी पिअरशेप बॉडी असलेली व्यक्ती आहे. माझी आज्जी अशीच होती, माझी आत्याही अशीच आहे. त्यामुळे मी जशी आहे तशी ठिक आहे,” असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली.

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

दरम्यान, या मुलाखतीत प्रियाने बाळाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तरही दिलं. लग्नाला १३ वर्षे झाली आहेत, पण अजून बाळ नसल्याने बरेच जण प्रश्न विचारत असतात. मला जेव्हा बाळ करावं वाटेल, तेव्हा मी बाळाचा निर्णय घेईन, नाही वाटलं तर नाही, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.