मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट होय. प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. प्रियाने १३ वर्षांपूर्वी अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे. लग्नाला १३ वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही, यावरून लोक खूप प्रश्न विचारतात, असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल, ते प्रश्न कसे हाताळतेस? असा प्रश्न ‘हॉटरफ्लाय’ च्या मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आला. त्यावर प्रिया म्हणाली, “तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? काही महिला आहेत, ज्यांना मुलं नकोयत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असं वाटतं. माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार.”

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

प्रियाने नाटकानंतरचा एक अनुभव सांगितला. “मी आणि उमेश एकत्र एक नाटक करतोय. नाटकानंतर लोक भेटायला येतात, एकेदिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आता आम्हाला गुडन्यूज पाहिजे’. मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळ कधी करणार’. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका,” असं प्रिया म्हणाली.

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत प्रेग्नन्सीबद्दल कमेंट्स आल्या, असा खुलासा प्रियाने केला. “नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर ‘प्रिया बापट प्रेग्नंट आहे’, अशा कमेंट्स होत्या. अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीवेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्यामते मी प्रेग्नंट आहे,” असं म्हणत प्रिया हसू लागली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat talks about not having baby after 13 years of marriage with umesh kamat hrc
First published on: 25-03-2024 at 14:13 IST