गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे छाया कदम. अभिनेत्री छाया कदम यांच्या कामाचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत जोरदार कौतुक होतं आहे. एवढंच नव्हे तर बहुचर्चित ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्येही (Cannes Film Festival 2024) त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine as Light) या चित्रपटाच नुकतंच ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये स्क्रिनिंग झालं. याच चित्रपटात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. म्हणूनच या चित्रपटानिमित्ताने छाया कदम यंदाच्या ‘कान फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवशी आई साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून गेलेल्या छाया कदम त्यानंतर ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाल्या.

हेही वाचा – “अल्लाह, बस मौत…”, ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stan ची खळबळजनक पोस्ट व्हायरल

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग अगोदर रेड कार्पेटवर छाया कदम यांनी इतर कलाकारांसह डान्स केला. मग चित्रपटाच्या स्क्रिनिंग नंतर उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन देऊन टाळ्यांच्या कडकडात केला. यावेळी छाया कदम भारावून गेल्या होत्या. त्यांनी सर्वांना फ्लाईंग किस करून हात जोडून आभार व्यक्त केले. त्यानंतर दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनी सगळ्यांना कौतुकाने मिठी मारली. या अभिमानस्पद क्षणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. इतर मराठी कलाकार छाया कदम यांचं खूप कौतुक करत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या या स्पर्धेत ३० वर्षांनंतर एखादा भारतीय चित्रपट शर्यतीत आहे. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटात छाया कदम व्यतिरिक्त कनी कुसरुती, दिव्या प्रभा या प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट : मुक्ताला कळालं आईच्या अपघातामागचं सत्य, ऐकून बसला आश्चर्याचा धक्का, पाहा व्हिडीओ

दरम्यान, छाया कदम यांच्या दोन हिंदी चित्रपटांचा खूप बोलबोला आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापजा लेडिज’ चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. छाया यांचे चित्रपटातील बरेच डायलॉगचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. याशिवाय कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटात छाया कदम झळकल्या आहेत. या चित्रपटातील देखील त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे.