तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाचा विजेता अल्ताफ तडवी उर्फ एमसी स्टॅनने (Mc Stan) चाहत्यांना धक्का बसेल अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमुळे सध्या एमसी स्टॅन चर्चेत आला असून एकच खळबळ उडाली आहे. तसंच त्याच्या स्टोरीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची स्टोरी एमसी स्टॅनने शेअर केली होती. या स्टोरीमधून त्याने ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. “ब्रेकअप…जेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि गृहीत धरलं जातं तेव्हा सर्वात दृढ झालेलं नातं देखील संपुष्टात येतं,” असं एका स्टोरीमध्ये लिहिलं होतं. तसंच दुसऱ्या स्टोरीमध्ये “समाप्त” असं लिहिलं होतं. या स्टोरीमुळे एमसी स्टॅनचे चाहते हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा एमसी स्टॅनने हैराण करणारी स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट : मुक्ताला कळालं आईच्या अपघातामागचं सत्य, ऐकून बसला आश्चर्याचा धक्का, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्विस्ट, जहागीरदारांच्या घरात किशोर परतणार अन् लीलाच्या बाबतीत मोठी गोष्ट समोर येणार

एमसी स्टॅनने स्टोरीमधून ईश्वराकडे मृत्यूसाठी प्रार्थना केली आहे. त्यामुळेच चाहत्यांना धक्का बसला आहे. एमसी स्टॅनने स्टोरीमध्ये लिहिलं आहे, “या अल्लाह, बस मौत दे.” त्याची ही स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून सर्व चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

“हे काय होतं आहे?”, “असं करू नकोस आपल्या चाहत्यांच्या विचार कर”, “आयुष्यात चढ-उतार येत असतात, मृत्यू हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही”, अशा एमसी स्टॅनच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: “माधुरी दीक्षितला मागे टाकलंस”, दिशा पटानीच्या मोठ्या बहिणीचा जबरदस्त डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, एमसी स्टॅनबद्दल बोलायचं झालं तर, त्याला लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनने वयाच्या बाराव्या वर्षापासून करिअरला सुरुवात केली होती. या वयात तो कव्वाली गायचा. अनेक मोठ्या गायकांबरोबर त्याने परफॉर्म केलं आहे. सहावीला असताना एमसी स्टॅनने रॅप लिहायला सुरुवात केली आणि आठवीला असताना त्याने पहिलं रॅप गाणं गायलं. मग ‘तडीपार’, ‘इंसान’ हे त्याचे दोन अल्बम एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरले. या गाण्यांमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेला एमसी स्टॅन आज त्याच्या मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झाला आहे.