‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अजूनही मुक्ताच्या आईच्या अपघाताचं प्रकरण सुरू आहे. या अपघातामागचा खरा गुन्हेगार मुक्ता शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून आदित्य असल्यामुळे सागरने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नसल्याचं सत्य आता मुक्ता समोर येणार आहे. एवढंच नव्हे तर माधवीच्या अपघातामागचा खऱ्या गुन्हेगाराच्या नावाचा खुलासा देखील लवकरच खुलासा होणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुक्ताची आई माधवीचा अपघात ज्या गाडीमुळे झाला, ती गाडी आदित्य चालवतं होता, हे सत्य फक्त सागर व सावनीला माहित आहे. पण आदित्यला काही होऊ नये म्हणून सागर हे सत्य सगळ्यांपासून लपवतो. तो मुक्तालाही सांगत नाही. पण लवकरच हे सत्य मुक्ता समोर येणार आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्विस्ट, जहागीरदारांच्या घरात किशोर परतणार अन् लीलाच्या बाबतीत मोठी गोष्ट समोर येणार

‘सीरियल जत्रा’ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मिहिरा मुक्ताला फोन करून सांगते की, मावशीच्या अपघाताचा तपास कुठेपर्यंत आला हे बघण्यासाठी पोलिसांत फोन केला होता. तर ते काय म्हणाले माहितीये का तुला? मावशीच्या नावाची कोणतीची तक्रार त्याच्याकडे दाखल झालेली नाहीये.

हेही वाचा – “थकलेल्या आभाळाला…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता नक्की वाचा

तर दुसऱ्याबाजूला हर्षवर्धन मुक्ताला अपघातामधील आरोपीचं नाव सांगतो. तो मुक्ता म्हणतो, सागरला माहितेय तुमच्या आईच्या अपघाताला कोण जबाबदार आहे ते? तुमचा आईचा अपघात घडवून आणणारी व्यक्ती एक स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव…मुक्ता म्हणते, सावनी? यावर हर्षवर्धन म्हणतो, बरोबर उत्तर. आता मुक्ता पुढचं पाऊल काय उचलते? ती स्वतः सावनी विरोधात तक्रार दाखल करते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: RCB VS RR सामन्यादरम्यान जान्हवी कपूरवर सेल्फीसाठी चाहत्यांनी फेकले फोन, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: “माधुरी दीक्षितला मागे टाकलंस”, दिशा पटानीच्या मोठ्या बहिणीचा जबरदस्त डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, गेल्या आठवड्याच्या आलेल्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. तेजश्री प्रधान व राज हंचनाळेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या यादी दुसऱ्या नंबरवर असायची, पण गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीत चौथ्या नंबरवर आली आहे.