‘बॉईज’ या चित्रपटाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांच्या गंमती पाहिल्यानंतर याच मुलांचं महाविद्यालयीन जीवन मांडणारा ‘बॉईज २’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.  ‘बॉईज’ या चित्रपटात गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्माल मस्ती पाहता आली होती. त्यामुळे ‘बॉईज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु यावेळी ‘बॉईज -२ ‘मधील या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

‘बॉईज २’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही काळातच चित्रपटातील ‘स्वाती डार्लिंग’ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजविण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे तिच्या प्रत्येक एण्ट्रीमध्ये टाळ्यांचा कडकडाट होताना दिसून येत आहे. सध्या लोकप्रिय ठरत असलेली ‘स्वाती डार्लिंग’ची भूमिका शुभांगी तांबाळेने वठविली आहे. विशेष म्हणजे तिचे प्रत्येक संवाद तरुणाईच्या ओठांवर दिसून येत आहे.  ‘नरू तुझं माझ्यावर प्रेमच नाही’, ‘वळण स्वभावाला नसलं तरीही शरीराला असलं पाहिजे’, हे तिचे संवाद प्रचंड फेमस झाले आहेत.

With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

‘ एका नावाजलेल्या चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी खरंच फार मोठी गोष्ट आहे. खरंतर माझी भूमिका प्रेक्षकांना एवढी आवडेल असं कधीच वाटलं नाही. सध्या महाराष्ट्रातून मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी मला फोन, सोशल मीडिया सारख्या माध्यमांचा वापर करुन माझं अभिनंदन करत आहेत, असं अभिनेत्री शुभांगी तांबाळेने सांगितलं.