मराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार सिनेमा देऊन प्रेक्षकांना याड लावणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराज यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तर १०० कोटींचा आकडा देखील पार केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले नागराज यांची एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट चित्रपटांसोबतच नागराज यांनी तितक्याच उत्तम शॉर्टफिल्म्स देखील बनवल्या आहेत.

नागराज यांच्या ३ शॉर्टफिल्म्स झी टॉकीज वाहिनीवर पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहेत. येत्या रविवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता नागराज यांच्या शॉर्टफिल्म्स ‘नागराजचा पिटारा’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नागराज यांच्या या पिटाऱ्यात ‘पावसाचा निबंध’, ‘बिबट्या – द लेपर्ड’ आणि ‘पायवाट’ या तीन शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

‘पावसाचा निबंध’ ही शॉर्टफिल्म नागराज यांनी दिग्दर्शित केली आहे. जेव्हा नागराज फॅन्ड्री या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तेव्हा पावसामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते. त्यावेळी नागराज यांना आपल्या बालपणीची आठवण झाली आणि त्यातूनच या शॉर्टफिल्मची कथा त्यांना मिळाली.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झालेली ‘बिबट्या’ ही शॉर्टफिल्म नागराज यांनी प्रस्तुत केली असून या शॉर्टफिल्मची कथा एका बिबट्या शिरलेल्या गावावर आधारित आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संपूर्ण गावकरी हे घरीच असताना एक मुलगी हरवते आणि तिला शोधण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन गावकरी घराबाहेर पडतात. त्या बिबट्याला पकडण्यासाठी गावकरी काय करतात हे या कथेमध्ये दर्शवले आहे.

‘पायवाट’ ही शॉर्टफिल्म देखील नागराज यांची प्रस्तुती असून ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या लघुपटाला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला. या लघुपटाची कथा एका गावातील मुलीवर आधारित आहे जी रोज खूप मोठं अंतर पार करत शाळेत चालत जाते.