scorecardresearch

करिना कपूरचे आई- वडील ३४ वर्षांपूर्वीच झाले आहेत एकमेकांपासून वेगळे, पण…

अभिनेता रणधीर कपूर आज ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

randhir kapoor, kareena kapoor, babita kpoor, randhir kapoor birthday, randhir kapoor age, रणधीर कपूर, करिना कपूर, रणधीर कपूर वाढदिवस, रणधीर कपूर वय, बबिता कपूर
रणधीर कपूर यांचं बॉलिवूड करिअर फार काळ चाललं नाही मात्र त्यांच्या खासगी आयुष्यतील चढ-उतारांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर यांनी फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र एकेकाळी त्यांचा अभिनय आणि आकर्षक लुक्समुळे ते नेहमीच चर्चेत होते. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये रोमँटिक नायकाच्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांची कारकिर्द फार काळ चालली नाही. रणधीर कपूर मागच्या बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहेत आणि फारसे कोणत्याही चित्रपटात दिसलेले नाहीत. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मात्र ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आज ते ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

रणधीर कपूर यांचं बॉलिवूड करिअर फार काळ चाललं नाही मात्र त्यांच्या खासगी आयुष्यतील चढ-उतारांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. रणधीर कपूर यांनी १९७१ मध्ये अभिनेत्री बबिता यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र १९८३ मध्ये रणधीर कपूर आणि बबिता यांच्यात खटके उडू लागले. ज्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला. १९८८ साली दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी एकमेकांपासून आजपर्यंत घटस्फोट घेतलेला नाही. मागच्या ३४ वर्षांपासून दोघंही वेगळे राहत आहेत.

रणधीर कपूर आणि बबिता यांनी करिना कपूर आणि करिश्मा कपूर या दोन मुली आहेत. पत्नी पासून वेगळे झाल्यानंतर रणधीर कपूर एकटेच राहतात. तर बबिता या त्यांच्या मुलींसोबत राहतात. आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना एकदा रणधीर कपूर म्हणाले होते, ‘मी आणि बबितानं प्रेमविवाह केला होता. मात्र माझं दारु पिणं तिला आवडत नव्हतं. आमचं दोघांचे विचार वेगळे होते. राहण्याच्या पद्धतीत फरक होता. त्यामुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.’

दरम्यान बबिता कपूर यांनी एक आई म्हणून आपल्या दोन्ही मुलींना एकट्यानं सांभाळलं. कपूर घराण्याच्या वर्षानुवर्षांच्या परंपरेला छेद देत त्यांनी करिना आणि करिश्मा यांना चित्रपटांमध्ये काम करण्यास परवानगी दिली. बबिता यांच्या याच निर्णयामुळे आज करिना आणि करिश्मा यांचं नाव नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Randhir kapoor birthday he is seprated from babita kpoor for last 34 years but till not divorced mrj