बेफिक्रे स्टार रणवीर सिंग हा त्या अभिनेत्यांपैकी एक आहे जो फक्त कॅमेऱ्यासमोरच नाही तर कॅमेऱ्या मागेही सकारात्मक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येतो. त्याचे स्विर्त्झलँडमधील फोटोशूट पाहिल्यानंतर वाटते की, ते एखाद्या हॉलिवूड सिनेमातलीच दृश्य आहेत असे वाटते. त्याने खूप साऱ्या सामानांच्या बॅगसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला मेसेज देताना त्याने लिहिले की, मला कमी सामानासोबत फिरायला जास्त आवडतं. दुसऱ्या फोटोमध्ये तो क्रूझवर उभा असलेला दिसत आहे. या फोटोला मेसेज देताना त्याने म्हटले की, स्विर्त्झलँडमध्ये तुमचे स्वागत आहे. अधिकतर फोटोंमध्ये रणवीरने निळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाचा कोट घातला आहे.

रणवीरचा ९ डिसेंबरला ‘बेफिक्रे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रणवीरसोबत वाणी कपूरही होती. सध्या रणवीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तो अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमासाठी रणवीरने दाढी वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या तो कुठेही गेला तरी त्याची वाढलेली दाढी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. पार्टीमध्ये जातानाही तो वाढवलेली दाढी आणि डोळ्यात सुरमा अशाच लूकमध्ये जातो. असे असले तरी ‘पद्मावती’ सिनेमातला त्याचा लूक अजूनपर्यंत दाखवण्यात आलेला नाही. या सिनेमासाठी रणवीर फार मेहनत घेताना दिसत आहे.

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल बोलताना रणवीर म्हणाला की, संजय लीला भन्साळी यांना कलाकारांकडून उत्तमोत्तम काम कसं काढून घ्यायचं याची पूर्ण कल्पना आहे. रणवीर आणि भन्साळी यांचा एकत्रित काम करणारा असा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी‘गोलियों की रासलीला : रामलीला’ आणि ‘गोलियों की रासलीला : रामलीला’ सिनेमात काम केले होते.