गूढ कथानक आणि मालवणी भाषा यामुळे ‘रात्रीस खेळ चाले -२’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या ही मालिका रंगतदार वळणावर आहे. असतानाच या मालिकेच्या सेटवर शोककळा पसरली आहे. या मालिकेच्या टीममधील एका सदस्याचं निधन झालं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला आपुलकीने चहा-कॉफी देणाऱ्या ओमभाई यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

शनिवारी (८ फेब्रुवारी) मालिकेच्या सेटवर ओमभाई यांनी सगळ्यांना चहा-कॉफी दिली आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु हदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. अशी माहिती देत आम्हाला त्यांची कायम उणीव भासत राहिलं असं अपूर्वाने म्हटलं.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

 

View this post on Instagram

 

रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका , त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफी ने . ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. तारीख ८.२ .२०२० त्यांनी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ४वाजता चहा कॉफी दिली.आणि अचानक छातीत दुखायला लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं आणि उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते निधन पावले. रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टिमला त्यांनी तरोताजा केले.म्हणुन आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील.त्याच्या पश्चात पत्नी , ३ मुली आणि १मुलगा असा परिवार आहे.म्हणुन त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून आमच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करु. आपणांस सांगु इच्छिते की तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे.आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. #apurvanemlekar #shevanta #shevantaswag #shevantalovers #ratriskhelchale2 #zeemarathi #humanityhelp #spotdada #ratriskhelchale #wemissyou #chailovers #coffeelovers

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

दरम्यान, अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ओमभाईंना श्रद्धांजली वाहिली. तसंच तिने ओमभाईंच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. ओमभाई यांनी ‘रात्रीस खेळ चाले १’च्या सेटवरही काम केलं होतं. त्यांचे सर्व कलाकारांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. ओमभाईंच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.