अभिनेता शाहरुख खान त्याच्या विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर आजवर छाप पाडत आला आहे. फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शाहरुखच्या चाहत्यांचा आकड्यामध्ये वाढ झाली आहे. अशा या किंग खानच्या नावे आणखी एक मानाची गोष्ट घडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका विषयावर भाषणासाठी शाहरुखला बोलवण्यात आले आहे.

वाचा: ‘नि:शब्द’सारखा चित्रपट करण्यासाठी शाहरुख तयार? 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मुख्याध्यापकांतर्फे शाहरुखला बोलावणे पाठवण्यात आले आहे. मुख्याध्यापक अॅलन रसब्रिजर यांनी ऑक्सफर्डमधील ‘द लेडी मार्गरेट हॉल’ येथे एका भाषणासाठी किंग खानला बोलवणे आमंत्रित आले आहे. त्यामुळे शाहरुखच्या शिरपेचात अणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असेच म्हणावे लागेल. शाहरुखच्या ऑक्सफर्डवारीबद्द्ल खुद्द अॅलन रसब्रिजर यांनीच ट्विट करत याबद्दल सांगितले.

शाहरुखच्या वाट्याला आलेल्या या बहुमानाविषयी त्याच्या प्रतिक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन महत्त्वाच्या विषयावर भाषण देण्याची शाहरुखची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने विविध ठिकाणी मार्गदर्शकपर भाषणे केली आहेत. दरम्यान ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून शाहरुखने साकारलेल्या जहांगीर खानच्या भूमिकेसाठी सध्या त्याचे कौतुक केले जात आहे. अलिया भट्ट, कुणाल कपूर, अंगद बेदी या कलाकारांच्या भूमिकांनी सजलेला ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट तिकीट खिडक्यांवरही चांगलीच कमाई करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये शाहरुखने तो हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? याबाबतच्या प्रश्नांला दिलेल्या उत्तरामुळे आता जवळपास सर्वांसमोर त्याचे हॉलिवूडमध्ये न जाण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शाहरुख गेला होता. यावेळी, त्याने ज्याप्रकारे त्याचे चित्रपट तिकीट बारीवर चालत आहेत त्या परिस्थिती त्याची बायको गौरी खान हिच्या दिग्दर्शनाखाली केलेला अभिनयच त्याला वाचवू शकतो, असे म्हटले. तू हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाहीस? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर शाहरुख म्हणाला की, बॉलीवूडमधील अभिनेत्री आता हॉलीवूडमध्ये जात आहेत आणि हॉलीवूडमधील अभिनेत्रींनी सलमान भारतात आणतोय. मग मी माझे १८ तास फुकट घालवून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तेथे का जाऊ. तसेच, अमेरिकेचे इमिग्रेशन ऑफिसर मी तेथे गेल्यावर प्रत्येकवेळी माझं ऑडिशन घेतात, असेही शाहरुख म्हणाला.