scorecardresearch

Premium

समंथा अक्किनेनीने केली ‘शाकुंतलम’च्या चित्रीकरणास पुन्हा सुरुवात

‘शाकुंतलम’च्या चित्रीकरणाचे दुसरेसत्र सुरु झाले आहे.

shooting for samantha akkinenis shaakuntalam resumes again post lockdown
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथाने तिचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गुणासेखर टीमवर्कस या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत घोड दौड सुरु असल्याचे दिसतं आहे. तर चित्रीकरणाचे दुसरेसत्र सुरु झाल्याचे त्यात म्हटले आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘शाकुंतलमच्या चित्रीकरणाचे दुसरेसत्र सुरु,’ अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या सोबत त्यांनी घोड्याचे इमोटीकॉन देखील वापरले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरु झाले आहे. या चित्रपटात ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची मुलगी शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या आयुष्यात कंगनाला महत्व नाही’, तापसीने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर करत आहेत. यात राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात समंथा आणि मल्याळम अभिनेता देव मोहन मुख्य भूमिका साकारणार आहेत. गुना टीमवर्क्स बॅनरखाली नीलिमा गुणा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shooting for samantha akkinenis shaakuntalam resumes again post lockdown in hyderabad dcp

First published on: 30-06-2021 at 12:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×