गायिका ‘सावनी रवींद्र’ने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. तिच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सावनी या गोड बातमी विषयी भावना व्यक्त करताना सांगते, "मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे." View this post on Instagram A post shared by Savaniee Ravindrra (@savanieeravindrra) आणखी वाचा : ‘ना साडीची चिंता ना आजू-बाजूच्या लोकांची’, सेल्फीसाठी महिलेचे पूशअप्स पुढे ती सांगते, "माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारच उत्सुक आहे."