आपल्या जबरदस्त फाइटिंगच्या प्रात्याक्षिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उसाहात सुरुवात केली आहे. सोमवारी भारतात दाखल झालेल्या जॅकी चॅन यांचे मुंबई विमानळावर मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी आलेला या चित्रपटातील त्यांचा सहअभिनेता सोनी सूदही आनंदात दिसत होता. जॅकी चॅन यांच्या भारत सफरीमुळे सध्या त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपासूनच जॅकी चॅन भारत दौऱ्यावर येणार अशा चर्चा बी टाऊनमध्ये रंगत होत्या. सोनू सूदनेही जॅकी चॅन यांच्या भारत दौऱ्याविषयीची रुपरेषा अनेकांसमोर उघड केली होती. त्यासोबतच जॅकी चॅन यांची सलमान खानला भेटण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. विविध कलाकारांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या सलमान खानने काही दिवसांपूर्वीच जॅकी चॅन आणि सोनू सूद यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

jackie-chan

jackie-chan-2

jackie-chan-3

jackie-chan-4

jackie-chan-sonu

‘कुंग फू योगा’ या चित्रपटामध्ये साहसीदृश्ये, थरार आणि विनोद यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. त्यासोबतच ‘कुंग फू योगा’ या चित्रपटामध्ये सोनू सूद आणि दिशा पटानी यांच्या रुपाने बॉलिवूडचा तडकाही असणार आहे. बीजिंग, दुबई आणि आयलॅण्डनंतर या चित्रपटाच्या शेवटच्या सत्राचे चित्रिकरण जोधपुरमध्ये करण्यात आले होते. जॅकी चॅन यांचा हा बहुचर्चित चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार विविध देशांतील चित्रपटसृष्टीतही आपले स्थान भक्कम करण्यास प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वीच हॉलिवूडचा अॅक्शन स्टार विन डिझेल त्याच्या ‘ट्रीपल एक्स….’ या चित्रटपटाच्या प्रसिद्धीसाठी भारतात आला होता. या चित्रपपटामध्ये विनसोबत दीपिका पदुकोणही मुख्य भूमिकेत होती. दरम्यान विन डिझेल मागोमाग आता जॅकी चॅन यांनीही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात हजेरी लावल्यामुळे चित्रपट वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्याबाबतच्याच चर्चांना उधाण आले आहे.