५० एकरांच्या आलिशान हॉटेलमध्ये निहारिकाचं लग्न; प्राइव्हेट जेटने पोहोचले दाक्षिणात्य सुपरस्टार्स

चिरंजीवी, रामचरण, अल्लू अर्जून, पवन कल्याण.. दाक्षिणात्य सुपरस्टार लग्नात सहभागी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित अभिनेत्री निहारिका कोनिडेला ९ डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. निहारिकाचं डेस्टिनेशन वेडिंग असून जयपूरमधल्या उदय विलास पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. याच ठिकाणी मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानीच्या लग्नाच्या काही विधी पार पडल्या होत्या.

निहारिकाचं लग्न ज्या हॉटेलमध्ये होतंय, त्याला जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलचा किताब मिळाला आहे. द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये ८७ खोल्या असून ५० एकर जागेत तो बांधला गेलाय. या आलिशान हॉटेलमध्ये व्यावसायिक चैतन्य जोनालगड्डाशी निहारिका लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या दोन दिवसांत संगीत व मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

पाहा फोटो : मृण्मयी देशपांडे ते नेहा पेंडसे.. पाहा मराठी अभिनेत्रींचा मनमोहक ‘ब्राइडल लूक’

या लग्नात सहभागी होण्यासाठी चिरंजीवी, राम चरण आणि अल्लू अर्जुन व त्यांचे कुटुंबीय प्रायव्हेट जेटने उदयपूर पोहोचले आहेत. निहारिका ही अभिनेते व निर्माते नागेंद्र बाबू यांची मुलगी आहे. नागेंद्र बाबू हे चिरंजीवीचे भाऊ आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि अल्लू अर्जुन हे निहारिकाचे चुलत भाऊ आहेत. तर चैतन्य हा जे. प्रभाकर राव यांचा मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

चैतन्य आणि निहारिकाने ऑगस्टमध्ये साखरपुडा केला होता. हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडला होता. निहारिकाने ‘सूर्यकांतम’, ‘हॅपी वेडिंग’, ‘स्येरा नरसिम्हा रेड्डी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: South star niharika konidela and chaitanya wedding all details and pictures ssv

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या