‘बिग बॉस १६’ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला लोकप्रिय रॅपर अल्ताफ तडवी उर्फ एमसी स्टॅन (Mc Stan) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चर्चेत कारण आहे ब्रेकअप. ‘बिग बॉस १६’मध्ये एमसी स्टॅन नेहमी गर्लफ्रेंड बुबाचा उल्लेख करायचा. तिच्याविषयी नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी सांगायचा. बुबावर किती प्रेम करतो, याविषयी एमसी स्टॅन सतत बोलायचा. पण त्याने कधीही सोशल मीडियावर गर्लफ्रेंडबरोबर फोटो शेअर केला नाही.

‘बिग बॉस १६’च्या घरात एमसी स्टॅनने एकेदिवशी बुबाबरोबर लग्न करणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं. पण त्याच्या आजच्या (९ मे) इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चाहते हैराण झाले आहेत. एमसी स्टॅनने इन्स्टाग्राम स्टोरीवरून ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं आहे.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा : वायफळ तक्रार!
Hardik Pandya Grabbed Fans Tshirt Jasprit Bumrah Reaction Video
हार्दिकवर चाहत्याने फेकला शर्ट? हे पाहताच बुमराहची प्रतिक्रिया होतेय व्हायरल; पाहा VIDEO
Rohit Sharma Mother Wrote Insta post
टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या आईची खास पोस्ट, मुलाचं कौतुक करत म्हणाल्या..
Rohit Sharma talking about captain cool video viral
VIDEO : एमएस धोनीने कौतुक करताच भारावला रोहित शर्मा; म्हणाला, ‘माही भाई तर…’
MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
AFG Coach Slams ICC After SA Victory
“स्वतःला अडचणीत आणायचं नाही पण..”, अफगाणिस्तान उपांत्य फेरीतून बाद होताच प्रशिक्षक ICC वर भडकले; म्हणाले, “पीच पूर्णपणे..”
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
Haris Rauf Statement on Viral Fight Video
“घरच्यांचा विषय निघतो तेव्हा…”, चाहत्यासह भांडणाच्या व्हायरल व्हीडिओवर हारिस रौफने मांडली आपली बाजू; पाहा काय म्हणाला?

हेही वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ नंतर ‘झी मराठी’ लवकरच येतेय ‘ही’ नवी मालिका, पाहा जबरदस्त प्रोमो

एमसी स्टॅनने आज इन्स्टाग्राम स्टोरीवर “ब्रेकअप” लिहित हार्ट इमोजी शेअर केलं होतं. शिवाय भावुक होतं लिहिलं होतं की, “जेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि गृहीत धरलं जातं तेव्हा सर्वात दृढ झालेलं नातं देखील संपुष्टात येतं.”

याशिवाय एमसी स्टॅनने आणखी स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये लिहिलं, “समाप्त.” या दोन स्टोरीमुळे एमसी स्टॅनचा ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या वर्षी ‘बिग बॉस १६’मध्ये एमसी स्टॅनने सांगितलं होतं की, पहिल्या भेटीतच तो बुबा (अनम शेख)च्या प्रेमात पडला होता. बुबा त्याच्या शेजारी राहत होती. एवढंच नाहीतर त्याला बुबाबरोबर लग्न देखील करायचं आहे. पण आता ब्रेकअप केल्यामुळे एमसी स्टॅनच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Video: तृतीयपंथी असल्यामुळे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल बुकिंग केलं रद्द, संतापून म्हणाली, “आम्ही वायफळ आणि घाणेरडं काम करायला आलो नाहीत…”

दरम्यान, एमसी स्टॅनबद्दल बोलायचं झालं तर, त्याला लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनने वयाच्या बाराव्या वर्षापासून करिअरला सुरुवात केली होती. या वयात तो कव्वाली गायचा. अनेक मोठ्या गायकांबरोबर त्याने परफॉर्म केलं आहे. सहावीला असताना एमसी स्टॅनने रॅप लिहायला सुरुवात केली आणि आठवीला असताना त्याने पहिलं रॅप गाणं गायलं. मग ‘तडीपार’, ‘इंसान’ हे त्याचे दोन अल्बम एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरले. या गाण्यांमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेला एमसी स्टॅन आज त्याच्या मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झाला आहे.