‘स्पायडरमॅन होमकमिंग’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता टॉम हॉलंड सध्या ‘स्पायडरमॅन’च्या पुढील भागाच्या चित्रीकरणाची तयारी करतो आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून पुढील भागाविषयी तो प्रचंड उत्साही असल्याचे दिसते. दरम्यान, त्याला चित्रपटाच्या पटकथेविषयी विचारले असता उत्तर देण्यास त्याने टाळाटाळ केली. परंतु, पुढील चित्रपटात ‘हल्क’ बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवत कदाचित आता ‘हल्क’ आणि ‘स्पायडरमॅन’ यांची जुगलबंदी पाहायला मिळेल असे अप्रत्यक्षरीत्या टॉमने संकेत दिले आहेत. ‘माव्‍‌र्हल’च्या आजवरच्या सर्व सुपरहिरो पटांतील पटकथा याआधी आपण कॉमिक्समधून वाचलेल्या आहेत. त्याच कथांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात बदल करून चित्रपटांतून त्या वापरल्या जातात. ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मध्ये आपण स्पायडरमॅन व आयर्नमॅन यांची केमिस्ट्री पाहिली आहे. ‘अल्टिमेट स्पायडरमॅन’ कॉमिक्सच्या एका भागात हल्क आणि स्पायडरमॅन यांची मुलाखत होते. ‘हल्क’ हा स्वत:च्या मेंदूवर ताबा नसलेला सुपरहिरो आहे. तो कोणताही विचार न करता थेट स्पायडरमॅनवर हल्ला करतो. दोघांत झालेल्या जोरदार मारामारीमुळे आजुबाजूचा प्रदेश बेचिराख होण्यास सुरुवात होते. आणि मग नेहमीप्रमाणे मध्यस्तीसाठी आयर्नमॅनला पुढाकार घ्यावा लागतो. टॉमच्या मते ही कॉमिक कथा त्याच्या सर्वात आवडत्या कथांपैकी एक आहे. शिवाय त्याला हल्कबरोबर काम करायची इच्छा आहे आणि साहजिकच प्रेक्षकांनाही पडद्यावर ही जोडी पाहण्याची नक्कीच उत्सुकता आहे.

गॉडझिलाचे पुनरागमन

Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

पृथ्वीवरील अवाढव्य विनाशकारी प्राणी, त्यांची जीवनशैली, मानवाच्या नवनवीन शोधांमुळे त्यांच्या आकारमानावर व आयुष्यावर होणारा परिणाम आणि स्वत:चे संकुचित होत जाणारे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड यांचे उत्तम चित्रीकरण आपण ‘ज्युरासिक पार्क’, ‘अ‍ॅनाकोंडा’, ‘द लँड बिफोर टाइम’, ‘लँड ऑफ द लॉस्ट’, ‘अ‍ॅडव्हेंचर्स इन डायनॉसॉर सिटी’ या चित्रपटांतून पाहिले आहे. या चित्रपटांनी एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. याच पठडीत मोडणारा गॅरेथ एडवर्ड्स दिग्दर्शित ‘गॉडझिला’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. प्रसिद्धी आणि तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन माइकल डॉगर्टी करत असून त्यांच्या मते हा पहिल्या भागापेक्षा वेगळा चित्रपट असणार आहे. पहिल्या भागाचे चित्रीकरण करताना काही तांत्रिक मर्यादा त्यांच्यासमोर होत्या पण गेल्या तीन वर्षांत तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाल्यामुळे दुसऱ्या भागाचे चित्रीकरण त्यांना अधिक परिणामकारक करता येईल. पहिल्या भागात ‘गॉडझिला’ या प्राण्याचे जे अक्राळविक्राळ स्वरूप प्रेक्षकांनी पाहिले होते. त्यापेक्षा जास्त भयानक आणि प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देणारा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. निर्मात्यांनी केन वाटानॅब, सॅली हॉकिंस, वेरा फारमिंगा, काइली चँडलर, मिली बॉबी ब्राउन या दर्जेदार अभिनेत्यांची फौज चित्रपटासाठी तैनात केली असून मार्च २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.