‘गर्भवती आणि व्हॅक्सिन?…’, सुष्मिताच्या वहिनीने गर्भवती असताना व्हॅक्सिन घेतल्याने नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

सुष्मिताच्या वहिनीने सोशल मीडियावर व्हॅक्सिन घेतल्याचा फोटो शेअर केला होता.

sushmita sen, charu asopa
चारु ही पाच महिन्यांची गर्भवती आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी सुष्मिता सेन लवकरच आत्या होणार आहे. सुष्मिताची वहिनी आणि अभिनेत्री चारु असोपा ही गर्भवती आहे. चारुने काही दिवसांपूर्वी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. चारु सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. चारुने नुकतीच करोना व्हॅक्सिन घेतली आहे. याची माहिती देत चारुने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी गर्भवती असताना व्हॅक्सिन का घेतलीस? आणि बरेच प्रश्न विचारले आहेत.

गर्भवती असताना व्हॅक्सिन घेतली पाहिजे की नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्यावर प्रत्येकाचे वेगळे मत आहे. या सगळ्यात चारुने व्हॅक्सिन घेतली. त्याचा फोटो चारुने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. चारु पाच महिन्यांची गर्भवती आहे. तर चारुने तिच्या बेबी बंपसोबत व्हॅक्सिन घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मी पहिली व्हॅक्सिन घेतली’, असे कॅप्शन चारुने दिले आहे. फोटोत चारुने निळ्या रंगाच शर्ट परिधान केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

चारुचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला अनेक प्रश्न विचारले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘गर्भवती आणि व्हॅक्सिन? कसं काय? आणि कोणती व्हॅक्सिन घेतली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘गर्भवती असताना व्हॅक्सिन घेतल्याने काही त्रास नाही ना.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मी गर्भवती असताना व्हॅक्सिन घेऊ शकते का? यामुळे बाळाला त्रास होणार नाही का?,’ असे अनेक प्रश्न चारुला नेटकऱ्यांनी विचारले आहे.

charu asopa, charu asopa instagram
चारुच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला प्रश्न विाचरले आहेत.

आणखी वाचा : अभिनेत्री गहनाचं इन्स्टाग्रामवर न्यूड लाईव्ह; लोकांना म्हणाली, हे पॉर्न आहे का?

चारुने २१ मे रोजी तिच्या युट्यूब चॅनलवरून एक व्हिडीओ शेअर करत ती गर्भवती असल्याची बातमी सगळ्यांना दिली होती. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. २०१९ मध्ये चारु आणि राजवीरने राजस्थानी रुढी-परंपरांनी गोव्यात लग्न केले. या आधी त्या दोघांनी कोर्टमध्ये लग्न केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushmita sen s sister in law charu asopa s first dose of corona vaccine during 5 months pregnancy dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या