छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी यांनी या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारले आहे.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करीत चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान त्यांची नवी पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मिलिंद गवळी सध्या पंजाबला फिरायला गेले आहेत. गवळी यांनी मुंबई ते पंजाब प्रवासादरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा- Video : कोकणी बॅन्जो, कलाकारांचा कल्ला अन् संगीत सोहळ्यात तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा रावडी डान्स, inside Video व्हायरल

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिले, “वाहे गुरु दा खालसा वाय गुरुदी फत्ते” खूप वर्षांनी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो, खूप वर्षांनी ‘आई कुठे काय करते’व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करतोय! ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगला दोन दिवसांची सुट्टी होती आणि म्हणून मी आलो पंजाबमध्ये. सकाळी सकाळी चंदीगड एअरपोर्टला उतरलो आणि तिकडून दोन तास प्रवास करून पटियालाला पोहोचलो! आपलं पंजाबी कल्चर आणि पंजाबी लोक हे खरेच larger-than-life आयुष्य जगत असतात!आणि मी ते पाहिलं आहे माझे दोन जुने मित्र बल्लू आणि रवींद्र सुरी, दोघेही कॅम्पस सीरियलमध्ये माझ्याबरोबर होते.”

मिलिंद यांनी पुढे लिहिले, “बल्लूच्या लग्नाला मला उशीर झाला म्हणून मी रात्री साडेनऊ-दहा वाजता तिथे पोहोचलो; बघतो तर त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं, मला वाटलं मी उशिरा पोहोचलो, लग्न लागून सगळे घरी निघून गेले. त्या हॉलमध्ये एक गृहस्थ होता त्याला मी विचारलं, “चले गये सब”, तर तो म्हणाला, ‘अभी शादी शुरू कहाॅं हुई है, रात को १२ बजे के बाद शुरू होगी बल्लू की शादी.’ त्या लग्नात इतकी धमाल होती, मी असं खाणं-पिणं-नाचणं पाहिलंच नव्हतं कधी. आज चंदीगड ते पटियाला येत असताना दोन्ही बाजूंना इतक्या मोठ्या मोठ्या शेतजमिनी बघून छान वाटलं, नाहीतर आपल्या महाराष्ट्राला ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’चा शाप आहे. भावा भावांच्या भांडणामध्ये प्रत्येकाच्या वाटेला एक वा दोन-चार एकर जमिनी येतात; पंजाबी पराठे सराटे खाऊन आपली भाकरी खायला येतो आपल्या महाराष्ट्रात परत.”

हेही वाचा- Video : कोकणी बॅन्जो, कलाकारांचा कल्ला अन् संगीत सोहळ्यात तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा रावडी डान्स, inside Video व्हायरल

मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, मालिका, चित्रपटामाध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. मराठीबरोबर हिंदी चित्रपटतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजत आहे.