मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यांत नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. प्रसाद ओक, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप अशा अनेक कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता यामध्ये आणख्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री रुचिरा जाधवने नुकतंच नवीन घर खरेदी करत आपल्या आई-वडिलांना गोड सरप्राइज दिलं आहे.

रुचिरा जाधवने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घरात गृहप्रवेश केला. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री लिहिते, “घर तिथे जिथे सुख आहे! घर म्हणजे जिथे माझी माणसं आनंदी असतील! घर ज्याला आपण घर बनवतो. माझ्या जीवनात फक्त काही छोट्या गोष्टी आहेत ज्या मला आनंद आणि समाधान देतात.”

हेही वाचा : ‘हे मन बावरे’ फेम शशांक केतकर व मृणाल दुसानिस पुन्हा झळकणार एकत्र? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

“माझ्या आई-बाबांच्या चेहऱ्यावरील गोड स्मितहास्याने मला आणखी प्रेरणा मिळते आणि यामुळेच घराचा निर्णय घेतला. स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याच्या या प्रवासात मला घर बनवणं किती महत्त्वाचं आहे हे जाणवलं.” असं कॅप्शन देत रुचिराने नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

नवीन घराच्या दारावर अभिनेत्रीने ‘रवि – माया’ अशी तिच्या आई-बाबांच्या नावाची नेमप्लेट लावली आहे. आपल्या लेकीने एवढी मोठी आनंदाची बातमी दिल्याने तिचा कुटुंबीय भारावून गेले आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.