मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, योगिता-सौरभ अशा अनेक ऑनस्क्रीन जोड्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नगाठ बांधली. यात आता अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचं नाव जोडलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता-शुभंकर लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील बऱ्याच मंडळींनी उपस्थिती लावली होती.

अमृता-शुभंकरने लग्नासाठी खास पारंपरिक आणि रिसेप्शन सोहळ्याला दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळालं होतं. ‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा आणि राणा म्हणजेच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता काही दिवसांपूर्वीच या दोघांचा विवाहसोहळा पार पडला आहे. मालिकेची संपूर्ण टीम त्यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होती.

हेही वाचा : “पहिली गाडी घेतली पण, तेव्हा बाबा नव्हते”, वडिलांच्या आठवणीत गौरव मोरे भावुक; म्हणाला, “मी आणि आई…”

थाटात लग्न केल्यावर अमृता-शुभंकर आता हनिमूनसाठी निघाले आहेत. हे दोघे भारतात नव्हे तर परदेशात फिरायला जाणार आहेत. पासपोर्टचा फोटो शेअर करत या जोडप्याने व्हिएतनाम फिरायला जात असल्याचं सांगितलं आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघांनी वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.

शुभंकर व अमृता निघाले व्हिएतनामला

हेही वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या भूमिकेत, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण; अक्षया म्हणते, “हे पात्र…”

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी कलाविश्वात अतिशय सन्मानाने घेतलं जातं. शुभंकर हा अश्विनी एकबोटेंचा लेक आहे. शुभंकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मुळे त्याची आणि अमृताची ओळख झाली. ऑनस्क्रीन नवरा-बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकार त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

अमृताने शेअर केला पासपोर्टचा फोटो

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेचा स्विमिंग पूलमधला फोटो पाहून चाहते म्हणतात, “आईसाहेब मारतील…”

दरम्यान, अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. या जोडप्याच्या लग्नातील बरेच व्हिडीओ व फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.