गोविंदाची भाची आरती सिंह लवकरच दीपक चौहान याच्याबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. आरतीचा भाऊ अभिनेता व कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि वहिनी कश्मीरा शाह या लग्नाची सगळी तयारी पाहत आहेत. हळद, संगीत, मेंदी असा हा समारंभपूर्वक सोहळा पार पडला आहे; तर आता लग्नाच्या तयारीला शर्मा कुटुंब सज्ज झाले आहे.

काल मंगळवारी (२३ एप्रिल) आरती आणि दीपक यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात बिग बॉस-१३ मधील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान पापाराझींसाठी कृष्णा आणि कश्मीरा पोज देत होते. तेव्हा कश्मीरा आणि कृष्णा यांनी एकमेकांना किस केले. या रोमॅंटिक कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा… भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”

पापाराझींनी वन्स मोअर म्हणताच कृष्णाने कश्मीराला तीन वेळा किस केले. हे बघून कश्मीरालाही धक्का बसला आणि ती म्हणाली, “मी घरवाली आहे की बाहरवाली आहे, हे सांगा.” याचे उत्तर म्हणून नंतर कृष्णाने सुदेशला स्टेजवर बोलावले आणि त्या दोघांची जोडी बाहरवाली आहे, असे सांगितले. कृष्णाच्या या मजेशीर वक्तव्यावर पापाराझींमध्ये हशा पिकला.

या संगीत सोहळ्यासाठी कश्मीरा मेटॅलिक ग्रे रंगाच्या इंडो-वेस्टर्न साडीमध्ये दिसली; तर कृष्णाने काळ्या रंगाच्या शिमरी आउटफिटची निवड केली होती. या सोहळ्यात कश्मीरा व कृष्णाच्या दोन्ही मुलांनीदेखील मॅचिंग आउटफिट्सची निवड केली होती.

आरती-दीपक आणि कृष्णा-कश्मीराने पापाराझींना मिठाई वाटली आणि २५ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या लग्नासोहळ्याचे आमंत्रण दिले.

हेही वाचा… ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचे अनसीन फोटोज झाले व्हायरल; चाहते म्हणाले, “हुबेहुब दिसणं…”

आरती सिंहने तिचा होणारा पती दीपक आणि तिची भेट कशी झाली? याबद्दल आरतीने ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. आरती म्हणाली होती, “मागच्या वर्षी २३ जुलैला आम्ही पहिल्यांदा बोललो आणि ५ ऑगस्टला पहिल्यांदा भेटलो. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्नाचं ठरवलं. पण, दोन्ही कुटुंबांनी होकार देईपर्यंत आम्ही पुढे गेलो नाही. १ जानेवारीला दीपकनं मला दिल्लीतील माझ्या गुरुजींच्या मंदिरात लग्नासाठी मागणी घातली आणि मी हो म्हणाले. तिथेच साखरपुडा झाला, असं मी मानते.”

हेही वाचा… पत्नी अर्पिता खानला केलं जातं अजूनही ट्रोल; आयुष शर्मा म्हणाला, “लोकं तिच्या रंगाची चेष्टा…”

दरम्यान, आरती आणि दीपकचं अ‍ॅरेंज मॅरेज आहे. दीपक हा नवी मुंबईचा असून, व्यावसायिक आहे. आरती सिंह आणि दीपक चौहान उद्या गुरुवारी (२५ एप्रिल) इस्कॉन मंदिरात लग्न करणार आहेत.