Premium

“५ वर्षांचा दुरावा आता संपणार”, नेहा पेंडसेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

अभिनेत्री नेहा पेंडसे ‘या’ मालिकेत साकाराणार महत्त्वाची भूमिका…

neha pendse new serial streaming on star bharat
नेहा पेंडसेची नवी मालिका

अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नेहा मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरीही, सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहा शेवटची ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव अभिनेत्रीने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद? ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा घेणार निरोप

‘मे आय कम इन मॅडम’ या लोकप्रिय मालिकेचं पहिलं पर्व २०१७ मध्ये संपलं. आता पुन्हा एकदा तब्बल ६ वर्षांनी या मालिकेचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा पेंडसेने या मालिकेच्या पहिल्या पर्वात महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना नव्या पर्वाची माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक

‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेचं दुसरं पर्व नुकतंच स्टार भारत या वाहिनीवर सुरु झालं. याबद्दल सांगताना अभिनेत्री लिहिते, “५ वर्षांचा दुरावा आता संपणार कारण ‘मे आय कम इन मॅडम’ मालिकेचे नवे भाग तुमच्या भेटीला पुन्हा आले आहेत. मला आशा आहे की, तुम्हाला हे सगळे भाग आवडतील. बरोबर ९.३० वाजता भेटूया स्टार भारतवर…”

हेही वाचा : Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”

नेहाच्या चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. यामध्ये ती संजना हितेशी हे पात्र साकारते. या मालिकेमध्ये नेहासह संदिप आनंद, सपना सिकरवार, दिपेश भान, अनुप उपाध्याय, सोमा राठोड या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neha pendse new serial streaming on star bharat will play important role in may i come in madam sva 00

First published on: 28-09-2023 at 12:09 IST
Next Story
झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता