Premium

‘अनुपमा’ मालिकेसाठी रुपा गांगूली नाही तर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री होती निर्मात्यांची पहिली पसंती, पण…

अभिनेत्रीने अनुपमा मालिका नाकारण्यामागच कारण सांगितलं आहे.

Anupama
अनुपमा

हिंदीतील ‘अनुपमा’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री रुपाली गांगूलीने मालिकेत साकारलेल्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र, या मालिकेसाठी रुपाली गांगूली निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला या भूमिकेसाठी पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं. मात्र, नेहाने या भूमिकेसाठी नकार दिल्यानंतर रुपाली गांगूली यांना ही ऑफर देण्यात आली.े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुला गमावण्याचं दुःख…”

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिने मराठीसह अनेक हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम केले आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’तील मुख्य भूमिकेसाठी नेहाला विचारण्यात आलं होतं. मात्र नेहाने ती ऑफर नाकारली. नुकत्याच एका मुलाखतीत नेहा पेंडसेने अनुपमा मालिका नाकारण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या घरच्यांना लाडक्या लेकीसाठी हवा आहे ‘असा’ जावई; म्हणाले, “जोडीदार…”

नेहा म्हणाली, “अनुपमा मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं होतं. पण मी ती ऑफर नाकारली. कारण याच मालिकेवर आधारीत मराठीत आई कुठे काय करते मालिका आहे. माझी आई ही मालिका रोज बघते. मीसुद्धा ही मालिका बघितली आहे. पण मी अशा प्रकारच्या मालिकेचा भाग बनू शकत नाही. अनुपमा एक अशी महिला आहे जी स्वत:बद्दल कधीच विचार नाही करत आणि नेहमी आपल्या नवऱ्यामुळे त्रासलेली असते.”

नेहा पुढे म्हणाली, “माझा त्यावेळेसचा निर्णय विनाशकाले विपरीत बुद्धी होता. अनुपमाच्या भूमिकेबरोबर मी स्वत:ला जोडू शकले नाही त्यामुळे मी हा निर्णय घेतला. मी अनुपमासारखी नाही त्यामुळे हे पात्र माझ्यासाठी साकारणे कठीण गेलं असतं.”

हेही वाचा- “आम्हाला मूल नकोय…,” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “आमच्या घरच्यांना…”

दरम्यान नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली आहे. ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neha pendse reveals why she rejected rupali ganguly role anupamaa dpj

First published on: 08-10-2023 at 12:40 IST
Next Story
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या घरच्यांना लाडक्या लेकीसाठी हवा आहे ‘असा’ जावई; म्हणाले, “जोडीदार…”